Nashik ZP : तब्बल 97 कोटींचा निधी परत गेल्याने नाशिकचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांचा संताप, जिल्हापरिषदेला कारणे सादर करण्याचे आदेश

Ayush Prasad, Nashik Collector : ९७ कोटींचा निधी वेळेत खर्च न झाल्यामुळे मार्च अखेरीस संबंधित निधी शासनाला परत करावा लागला आहे. जिल्हापरिषद प्रशासनावर ही नामुष्की ओढावल्याने जिल्हाधिकारी संतप्त झाले.
Ayush Prasad,Nashik Collector
Ayush Prasad,Nashik CollectorSarkarnama
Published on
Updated on

Nashik Zilla Parishad : नाशिक जिल्हा परिषदेला २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ९७ कोटींचा निधी ३१ मार्च २०२६ पर्यत खर्च करणे अपेक्षित होते. मात्र, जिल्हा परिषदेकडून वेळेत निधी खर्च न झाल्यामुळे मार्च अखेरीस संबंधित निधी शासनाला परत करावा लागला.

तब्बल ९७ कोटींचा निधी परत करण्याची नामुष्की ओढावल्याने जिल्ह्याचे आर्थिक नुकसान झाले असून, पर्यायाने विकासकामांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे संतापलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हापरिषद प्रशासनाला चांगलच धारेवर धरलं. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी परत गेलेल्या निधीची कारणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारण उपयोजनांसाठी या वर्षी (२०२६-२७) ९६० कोटींचा निधी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीतच जिल्हाधिकाऱ्यांनी मागील वर्षातील अखर्चित परत गेलेल्या निधीचा हिशोब मांडण्याचे आदेश जिल्हापरिषद प्रशासनाला दिले.

Ayush Prasad,Nashik Collector
Nashik ZP No Vehicle Day : पीएम मोदींच्या आवाहनाला नाशिक झेडपी'चा प्रतिसाद, दर सोमवारी आता 'नो व्हेइकल डे'

कोणत्या विभागाचा किती निधी परत गेला व निधी परत जाण्यामागील कारणे याची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान मागील अनुभव बघता जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यंदा शंभर टक्के निधी खर्चासाठी आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजनांतर्गत डिसेंबरपर्यंत शंभर टक्के निधी खर्चाचे नियोजन पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे निधी का परत गेला याची सविस्तर कारणे आता प्रशासनाला जिल्हाधिकारी यांना सादर करावे लागणार आहे.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण आराखड्यातून साधारणत: २५ ते ३० टक्के निधी हा जिल्हा परिषदेच्या विविध योजना तसेच विकासकामांवर खर्च होत असतो. चालू आर्थिक वर्षात ९६० कोटींच्या तुलनेत अंदाजे २४० ते अडीचशे कोटींच्या आसपास निधी जिल्हा परिषदेसाठी राखीव असणार आहे. मात्र ३१ मार्च रोजी तब्बल ९७ कोटींचा निधी परत गेल्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Ayush Prasad,Nashik Collector
नाशिकच्या 1 हजार 128 अधिकाऱ्यांचा काळजाला भिडणारा निर्णय, सर्वत्र होतय कौतुक

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीत सर्व विभागांनी आपआपल्या पातळीवर विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवत निधीची मागणी करावी.

त्यापूर्वी सर्व तांत्रिक व प्रशासकीय मान्यतांची पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती पुढे सादर करावे, तसेच प्राप्त होणारा निधी डिसेंबरअखेर शंभर टक्के खर्च होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com