Tukaram Mundhe News: अण्णा हजारेंनी थोपटली मुंढेंची पाठ! अन्न भेसळविरोधात काय म्हणाले?

Anna Hazare on Tukaram Mundhe: राज्यात सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी मोहिमेबद्दल अण्णा हजारे यांनी तुकाराम मुंढे यांचे कौतुक केले असून समाजासाठी अशा धाडसी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज असल्याचे म्हटले आहे.
Anna Hazare on Tukaram Mundhe
Anna Hazare on Tukaram MundheSarkarnama
Published on
Updated on

पारनेर : राज्यात तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या अन्न भेसळविरोधी मोहिमेचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कौतुक केले आहे. “तुकाराम मुंडे यांच्यासारखे समाजहितासाठी काम करणारे अधिकारी देशात मोठ्या प्रमाणात निर्माण झाले पाहिजेत. त्यांच्या कार्याचा गुणाकार व्हायला हवा,” असे मत त्यांनी व्यक्त केले. समाज आणि प्रशासनात अधिकाधिक प्रामाणिक व धाडसी अधिकारी तयार होण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

समाजहितासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे अण्णा हजारे हे केवळ शासनाच्या चुकीच्या धोरणांवर टीका करत नाहीत, तर चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे खुलेपणाने कौतुकही करतात. सध्या राज्यभर सुरू असलेल्या भेसळविरोधी कारवाईत पुढाकार घेणारे अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कार्याची त्यांनी विशेष दखल घेतली.

हजारे यांनी केवळ मुंडे यांच्या मोहिमेचे समर्थनच केले नाही, तर अशा अधिकाऱ्यांची संख्या वाढणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. समाजाच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर कठोर भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना जनतेचा पाठिंबा मिळायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अण्णा हजारे स्वतःही समाजहिताच्या नव्या उपक्रमात सक्रिय झाले आहेत. वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी ‘ना नफा – ना तोटा’ या तत्त्वावर लाकडी घाण्यातून तयार होणाऱ्या भेसळमुक्त खाद्यतेल उत्पादनाचा उपक्रम सुरू केला आहे. सूर्यफूल, करडई, तीळ आणि खोबरेल तेल थेट ग्राहकांपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचवण्याचा त्यांचा संकल्प आहे.

Anna Hazare on Tukaram Mundhe
Shivsena News: एकनाथ शिंदे पुन्हा दाढीवर हात फिरवणार? ठाकरेंचे १४ आमदार फुटणार; शिवसेना मंत्र्यांचा मोठा दावा

रिफाइंड आणि भेसळयुक्त तेलांच्या वाढत्या वापरामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन, नागरिकांना नैसर्गिक आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. अण्णा हजारे यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, निरोगी आणि भेसळमुक्त समाज घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Anna Hazare on Tukaram Mundhe
Congress Reshuffle: पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी क्षणात आमदारकी सोडली : काँग्रेसकडून तब्बल 17 वर्षांनंतर राष्ट्रीय पातळीवर संधी

देशाला आदर्श गाव संकल्पना देणारे आणि भ्रष्टाचारविरोधी लढ्यात अग्रस्थानी राहिलेले अण्णा हजारे आता निरोगी समाजासाठीही नवा आदर्श निर्माण करत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com