Vinayak Mete  Sarkarnama
मराठवाडा

Vinayak Mete : 'मरावे परी कीर्ती रुपे उरावे' दिवंगत विनायकराव मेटेंना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर

Datta Deshmukh

Beed News : तीस वर्षांच्या सार्वजनिक जिवनात मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण, अरबी समुद्रातील अंतरराष्ट्रीय शिवस्माकर साठी रस्त्यावरची लढाई लढतानाच विधीमंडळातही आक्रमक आणि अभ्यासू मांडणी करणाऱ्या दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांना 2020 - 2021 या वर्षाकरता महाराष्ट्र विधानपरिषद ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण मंगळवारी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते होणार आहे. दिवंगत मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे पुरस्काराचा स्वीकार करतील.

मराठा महासंघातून मराठा आरक्षण लढ्यात सामील झालेले दिवंगत मेटे 27 वर्षे विधान परिषदेचे सदस्य राहीले. सर्वाधिक वेळा विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेण्याचा त्यांचा विक्रम कायम आहे. मराठा आरक्षणाबरोबरच अरबी समुद्रातील अंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण, शासकीय नोकर भरतीमधील वयाची अट, शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन,

मराठा समाजातील (Maratha ) होतकरू विद्यार्थ्यांना उच्च व परदेशी शिक्षणाकरिता विद्या वेतन व मार्गदर्शनाकरिता सारथी या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेची संकल्पनाही मांडण्यातही त्यांचा पुढाकार होता.

त्याद्वारे असंख्य विद्यार्थ्यांना लाभ मिळवून दिला. पोलीस भरतीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. या बाबतच्या मागण्यांसाठी आपल्या आक्रमक आणि अभ्यासू भाषणाने दिंवगत विनायकराव मेटे (Vinayak Mete) यांनी कायम विधीमंडळाचे सभागृह दणाणून सोडले. या मागण्यांसाठी त्यांनी रस्त्यावरचीही लढाई लढली. दरम्यान, 14 ऑगस्ट 2022 रोजी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीला जाताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले. परंतु, त्यांच्या कर्तृत्वाचा उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने त्यांच्या पश्चात् सन्मान होणार आहे. त्यांच्या पत्नी शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT