Santosh Deshmukh Walmik Karad sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad Threat : संतोष देशमुखांपेक्षा जास्त हाल करून मारल, कारागृहातून वाल्मिक कराडची धमकी? महादेव गित्तेच्या बायकोने सगळचं सांगितलं

Walmik Karad Threatens Mahadev Gitte meera Mahadev : कारागृह प्रशासन पूर्णपणे वाल्मिक कराडच्या हातामध्ये आहे. तो जसा नाचवतोय तसं प्रशासन नाचत आहे. वाल्मिक कराडला त्या जेलमधून हलवायला हवं होतं. पण माझ्याच पतीला हलवलं, असे मीरा गित्ते म्हणाल्या.

Roshan More

Walmik Karad News : संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा बीड जिल्हा कारागृहात आहे. मात्र, त्याला संतोष देशमुख यांच्या हत्येचा कुठलाचा पश्चाताप नसून त्याने महादेव गित्तेला संतोष देशमुख यांच्या पेक्षा जास्त हाल करू मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मीरा गित्ते यांनी केला आहे. मीरा या महादेव गित्तेच्या पत्नी आहेत.

' ते (वाल्मिक कराड) म्हणतात आम्ही आणि तुम्ही आत तुरुंगात आहोत म्हणून वाचलात. बाहेर असता तर संतोष देशमुखांचे हाल करून मारलं त्यापेक्षा जास्त हाल करून मारलं असतं.', असे मीरा गित्ते यांनी सांगितले.

मीरा गित्ता यांनी दावा केला की, बीड कारागृहात वाल्मिक कराड याला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत होती. त्याला महादेव गित्ते विरोध केला. त्यामुळे कारागृहात कराडच्या गँगने आपले पती महादेव गित्ते यांना मारहाण केली. या मारहाणीचे प्लॅनिंग तीन दिवस आधीच करण्यात आले होते.

कारागृह प्रशासन पूर्णपणे वाल्मिक कराडच्या हातामध्ये आहे. तो जसा नाचवतोय तसं प्रशासन नाचत आहे. वाल्मिक कराडला त्या जेलमधून हलवायला हवं होतं. पण माझ्याच पतीला हलवलं. वाल्मिकला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत होती. त्याविरोधात माझ्या पतीने आवाज उठवला. म्हणून त्यांना बाहेर काढलं.

सीसीटीव्ही फुटेज का देत नाही?

वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला महादेव गित्ते याने मारहाण केल्याची चर्चा होती. मात्र,कारागृह प्रशासना वाल्मिक कराड आणि महादेव गित्ते यांच्यात काहीच वाद झाला नसून मारहाणीचा दावा खोटा असल्याचे म्हटले होते. त्यावर मीरा गित्ते यांनी आपल्या पतीलाच वाल्मिक कराडच्या माणसांकडून कारागृहात मारहाण झाली. मी कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागत आहे मात्र ते देत नाही. देत फुटेज का देत नाही याचे कारण त्यांनी सांगावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT