Abdul Sattar News Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : अब्दुल सत्तार हाजीर हो.. शपथपत्र प्रकरणात दर आठवड्याला सुनावणीचे आदेश!

In the affidavit case, the court has ordered weekly hearings, increasing legal pressure on Maharashtra Minister Abdul Sattar. : सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून 2014 आणि 2019 च्या निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डाॅ.अभिषेक हरिदास यांनी केला होता.

Jagdish Pansare

Sillod Court Order News : माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रातील माहितीवरून दाखल फौजदारी याचिकते सिल्लोड न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी दर आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी घेण्याचे आदेश सिल्लोड फौजदारी व दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीस के.टी. अढायके यांनी दिले आहेत.

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून 2014 आणि 2019 च्या निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डाॅ.अभिषेक हरिदास यांनी केला होता. याविरोधात फौजदारी याचिका दाखल केली आहे. (Abdul Sattar) शेतजमीन, व्यावसायिक व निवासी मालमत्तेची खरेदी मूल्य वेगवेगळे दाखवण्यात आल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले. याशिवाय ऋणबंध, बंधपत्र, शेअर्स तसेच म्युच्युअल फंडाचा तपशील देण्यात आलेला नाही.

तसेच शैक्षणिक माहिती चुकीची दिल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. (Shivsena) या प्रकरणात न्यायालयाने पोलीसांना तीनवेळा तपास अहवाल मागवला. 11 जुलै 2023 रोजी तत्कालीन न्यायाधीश मिनाक्षी एम. धनराज यांनी सत्तार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून खटला सुरु करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार लोकप्रतिनिधींच्या प्रकरणात दररोज सुनावणी घेण्याचे निर्देश आहेत.

त्यानूसार अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणात प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुनावणी होणार आहे. यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचा अवघ्या 2420 मतांनी विजय झाला. काठावर पास झालेल्या अब्दुल सत्तार यांना नव्या महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणूनही संधी देण्यात आली नाही. मतदारसंघात विरोधक वरचढ होत असताना सत्तार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे.

विधानसभा निवडणुकीत लोकांनी जातीला महत्व दिले, अशी नाराजी व्यक्त करत सत्तार यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नगरपरिषदेत सत्तारांची कोंडी करण्याचा भाजपासह अन्य विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. अशातच सिल्लोड न्यायालयाने शपथपत्र प्रकरणात सत्तार यांची दर आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिल्याने सत्तार पुन्हा गोत्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT