Suresh Dhas Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas : कृष्णा आंधळे करून करून काय करणार?; पुरावे तर विष्णू चाटे अन्‌ ‘आका’ने नष्ट केलेत : सुरेश धसांचा नवा बॉम्ब

Santosh Deshmukh murder Case : संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणेसोबत मी सतत बोलत आहे. पण, कृष्णा आंधळेला घराबद्दल, कुटुंबाबद्दल कसलीही आस्था नाही. कारण त्याची हिस्ट्रीच तशी सांगते आहे. त्याला कोणाबद्दलही प्रेम नाही.

Vijaykumar Dudhale

Beed, 03 February : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख जे बोलत आहेत, ते चुकीचे नाही. पण, कृष्णा आंधळे करून करून काय करणार आहे. तो काय पुरावे नष्ट करतोय. पुरावे नष्ट करण्याचे पाप विष्णू चाटे आणि ‘आका’ने केलेले आहे. विष्णू चाटे याने दहा तारखेनंतरचे त्याचं आणि ‘आका’सोबतचं असणारं बोलणं, हे सीआयडीसमोर येऊ नये, असा प्रयत्न केला आहे. मात्र, तो त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. कारण, पोलिस संबंधित कंपनीकडून त्यांच्यात काय संवाद झाला, हे मिळवू शकतात. त्याने मोबाईल बंद करून पाण्यात टाकला असावा. तो लवकरात लवकर सापडेल, असेही आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले.

संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा फरारी झाला आहे. तो पुरावा नष्ट करत आहे, अशी शंका धनंजय देशमुख व्यक्त करीत आहेत. त्यावर बोलताना सुरेश धस (Suresh Dhas) यांनी कृष्णा आंधळेची हिस्ट्रीच काढली आहे. धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेली शंका खरी आहे, त्याचाही तपास पोलिसांनी केला पाहिजे, असेही धस यांनी सांगितले.

धस म्हणाले, संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणेसोबत मी सतत बोलत आहे. पण, कृष्णा आंधळेला घराबद्दल, कुटुंबाबद्दल कसलीही आस्था नाही. कारण त्याची हिस्ट्रीच तशी सांगते आहे. त्याला कोणाबद्दलही प्रेम नाही. ते निघालं की, कुठंही एकटंच निघतं, तसं ते गेलेलं आहे. जाऊन जाऊन ते कुठं जाणार आहे, पोलिस आणि सीआयडी तपासाच्या बाहेर तो जाऊच शकत नाही.

धनंजय देशमुख यांचा त्रागा रास्त आहे. मी धनंजय देशमुख आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबासोबत आहे. मी आजच तेथील डीवायएसपीशी बोललो आहे, त्यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. याशिवाय एसपींनी त्यांना एलसीबीचेही काही सहकारी तपासासाठी दिले आहेत. महादेव मुंडेंचे मारेकरीसुद्धा लवकर सापडले पाहिजेत. त्याच्या मुलाच्या डोळ्यातील पाणी पाहून माझाही प्रचंड संताप झालेला आहे, त्यामुळे त्याला न्याय मिळणे गरजेचे आहे, असेही सुरेश धस यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळात बीड जिल्ह्यात काय गोंधळ घातला आहे, हे सर्व पुढे आले पाहिजे. सध्या तेलबियासंदर्भात काही कागदपत्रं माझ्याकडं आली आहेत. पण, माझा कार्यक्रम असल्यामुळे काही दिवसांनंतर त्यावर मी बोलणार आहे. संतोष देशमुख खून प्रकरणावरून मीडियाचे लक्ष दुसरीकडे वळू नये; म्हणून मी त्यावर सध्या बोलणार नाही, असेही सुरेश धस यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT