Pankaja Munde sarkarnama
मराठवाडा

Beed Loksabha News : पंकजा मुंडेंच्या विरोधात कोण? राष्ट्रवादीची आज बैठक...

Sharad Pawar मागील वर्षी ही जागा राष्ट्रवादीने लढल्याने या वेळीही राष्ट्रवादीतील शरद पवार गटच त्यावर दावा करत आहे.

Umesh Bambare-Patil

Beed Loksabha News : बीड लोकसभेसाठी महायुतीकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. बीडच्या जागेवर मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे आज उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटात इच्छुकांची संख्या जास्त असली तरी मोजक्याच लोकांशी चर्चा केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी सध्या वातावरण तापू लागले आहे. महायुतीकडून बीडची जागा भाजपला दिली असून, त्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीला तोडीस तोड उमेदवार देण्याचे आव्हान आहे.

मविआकडून अद्याप तरी बीडची जागा कोणाला, हे अधिकृत निश्चित झालेले नाही. मागील वर्षी ही जागा राष्ट्रवादीने लढल्याने या वेळीही राष्ट्रवादीतील शरद पवार गटच त्यावर दावा करत आहे. त्यामुळेच आज खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बीडचा उमेदवार ठरविण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता यात कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते ? याकडे लक्ष लागले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून डॉ. नरेंद्र काळे, प्रा. ईश्वर मुंडे, सुशीला मोराळे, रविकांत राठोड हे इच्छुक आहेत, तर डॉ. अशोक थोरात, डॉ. ज्योती विनायकराव मेटे, बजरंग सोनवणे यांच्याही नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे यापैकी कोणाचे नाव निश्चित होणार याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडी येथून तगडा उमेदवार देण्याची तयारी करत आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT