Nagar News : वंचितबरोबर तेच गुऱ्हाळ; महाविकास आघाडीला 'बहुजन मुक्ती'ने घेरलं

Bahujan Mukti Patry महाविकास आघाडीत प्रवेश न मिळाल्यास स्वतंत्र चूल मांडून पक्ष स्वबळावर पुढील निवडणुकांना समोरे जाईल, अशी भूमिका बहुजन मुक्ती पक्षाने घेतली आहे.
Nagar Bahujan Mukti Party Meeting
Nagar Bahujan Mukti Party Meetingsarkarnama
Published on
Updated on

Nagar News : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांची विचारसरणी असलेले छोटे घटक पक्ष महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक आहेत. वंचित महाविकास आघाडीत येण्याचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. यातून मार्ग निघत नसतानाच बहुजन मुक्ती पक्षानेदेखील महाविकास आघाडीला घेरण्याची तयारी केली आहे. बहुजन मुक्ती पक्षाची नगर जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने बूथबांधणी झाली असून, स्वबळावरदेखील निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.

महाविकास आघाडीत प्रवेश न मिळाल्यास स्वतंत्र चूल मांडून पक्ष स्वबळावर पुढील निवडणुकांना समोरे जाईल, अशी भूमिका बहुजन मुक्ती पक्षाने घेतली आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक नगरमध्ये झाली. याचबरोबर या बैठकीत पक्षाच्या राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यात आला.

कामगार नेते रावसाहेब काळे पाटील, बुहजन मुक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, भारत मुक्ती मोर्चाचे सुभाष आल्हाट, इम्पाचे डॉ. भास्कर रणनवरे, बहुजन क्रांती मोर्चाचे युसूफ शेख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष खालिद खान, बेरोजगार मोर्चाचे राहुल पगारे, राष्ट्रीय मूलनिवासी मोर्चाचे नादीर सय्यद यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.

Nagar Bahujan Mukti Party Meeting
Nagar Urban Bank News : भाजपचे माजी खासदार गांधींना वीस लाख; तर बॅंक अधिकाऱ्याला दिले दहा लाख...

कामगार नेते रावसाहेब काळे (Raosaheb Kale) यांनी देशात बहुजन मुक्ती पक्षाने सर्व प्रथम ईव्हीएम मशीनला विरोध केला. या मशीनचे धोके लक्षात आणून दिले. प्रस्थातिप पक्षांतील संस्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या संस्था वाचवण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत. यातून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे. सोयीच्या राजकारणामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे.

पुढे यातून अनेक विघातक शक्ती देशात अस्थिरता निर्माण करतील. यामुळे समविचारी पक्षाने एकत्र येऊन लोकसभा निवडणुकीला समोरे गेले पाहिजे. जनतेचे प्रश्‍न आणि राज्यघटना बचावासाठी सर्वांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, खासगीकरणाचा प्रश्‍न गंभीर बनत असताना निर्णायक भूमिका घेण्याचे आवाहन रावसाहेब काळे यांनी केले.

Nagar Bahujan Mukti Party Meeting
Vivek Kolhe News: ...असे आहे विखेंचे राजकारण, कोल्हेंकडून मोठा खुलासा | Nagar Politics |

बहुजन मुक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले यांनी महाविकास आघाडीत संधी न मिळाल्यास बहुजन मुक्ती पक्ष स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार आहे. लोकशाही देशात संविधान धोक्यात आले असून, संविधानाला बगल देऊन हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagar Bahujan Mukti Party Meeting
Nagar Loksabha Election : नगर दक्षिणेतून राम शिंदेही लोकसभेच्या रिंगणात ?

सत्तेसाठी नव्हे, तर बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष सुरू राहील, असे सांगितले. सुभाष आल्हाट यांनी जातनिहाय जनगणना होत नसल्याने, बहुजन समाजाला न्याय-हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे ईव्हीएममुळे हुकूमशाही प्रस्थापित होत असताना, नागरिकांनी जागरुक होण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले.

Edited By : Umesh Bambare

R

Nagar Bahujan Mukti Party Meeting
Vanchit Bahujan Aghadi : प्रकाश आंबेडकर म्हणाले, जोपर्यंत जागावाटप होत नाही, तोपर्यंत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com