Minister Tanaji Sawant-Rana Patil News, Osmanabad Sarkarnama
मराठवाडा

Osmanabad News : शिक्षक मतदारसंघात भाजपने शिंदे गटाच्या सावंतांची मदत का घेतली नाही ?

Tanaji Sawant : उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत यांची तर संस्थाचालक म्हणुन ओळख आहे.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात भाजपने शिंदे गटाला विश्वासात घेतले नाही, असा आरोप केला जात आहे. बुलडाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी हा आरोप केल्यानंतर इकडे मराठवाड्यात देखील हेच चित्र पहायला मिळाले. उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपने आमदार राणाजगजीतसिंह पाटील (RanaJagjeetsingh Patil) यांची निवडणूक प्रमुख म्हणून नेमणूक केली होती. पण त्यांनी शिंदे गटाला सोबत घेण्याऐवजी एकला चलो रे ची भूमिका स्वीकारली.

परिणामी राज्याचे आरोग्य व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या प्रा. तानाजी सावंत सारख्या बलाढ्य नेत्याची मदत देखील (Bjp) भाजप उमेदवाराला होवू शकली नाही. म्हणायला शिंदे आणि भाजपची राज्यात सत्ता आहे. पण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही एकट्या भाजपनेच आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचा प्रयत्न केला. (Osmanabad) जिल्ह्यात व मराठवाडा, व इतर ठिकाणी देखील शिंदे गटाला डावलल्याने भाजपची दुरावस्था झाल्याची चर्चा आता होवू लागली आहे.

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर एक महत्वाची गोष्ट आता समोर येऊ लागली आहे. भाजपच्या अंतर्गत गटात नाराजी व शिंदे गटाचा नसलेला समन्वय हेच पराभवामागील कारणापैकी एक आहे. या मतदारसंघाची जबाबदारी भाजपने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर सोपविली होती. राष्ट्रवादीमधील त्यांची कार्यपध्दती ही एकाधिकारशाहीची राहिलेली होती भाजपमध्ये आल्यानंतरही त्यामध्ये फारसा फरक पडलेला नसल्याचे या निवडणुकीच्या व्यवस्थापनावरुन लक्षात येत आहे.

राष्ट्रवादीने या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करुन दाखविली असुन पहिल्या पसंतीमध्ये विजय मिळाला नसला तरी पराभव टाळण्यात पक्ष यशस्वी ठरला आहे. दुसऱ्या बाजुला भाजप पहिल्या पसंतीची मतांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आमदार विक्रम काळेचा पराभव करण्यासाठी या मतदारसंघाची जबाबदारी उस्मानाबादचे मातब्बर नेते राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर सोपविली होती.

त्याचे मुख्य कारण काळे हे देखील उस्मानाबादचेच असुन अनेक वर्ष त्यांच्याबरोबर राणा पाटील यांनीही काम केले होते. त्यांच्या उणीवाची कल्पना पाटील यांना अवगत होत्या, मात्र पक्षामध्ये येऊन जेमतेम तीन वर्ष झालेल्या राणा पाटील यांच्यावर मराठवाड्याच्या मतदारसंघाची जबाबदारी देणे भाजपमधील अनेकांना पचणी पडले नव्हते. त्यात राणा पाटील यांची कार्यपध्दती अत्यंत एकाधिकारशाहीची असल्याचा त्यांच्यावर राष्ट्रवादीमध्ये असताना आरोप व्हायचा. अगदी त्याप्रमाणे या निवडणुकीतही समन्वयाचा अभाव दिसुन आला.

संभाजी पाटील निलंगेकर, पकंजा मुंडे, सुरेश धस आदि नेते या निवडणुकीत क्वचितच सक्रिय दिसले. तसेच बाळासाहेबांची शिवसेना यातील मंत्री,आमदार यांनाही प्रक्रियेमध्ये कुठेही स्थान देण्यात आले नव्हते. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत यांची तर संस्थाचालक म्हणुन ओळख आहे. स्वतःच्या अभिमत विद्यापीठाची परवानगी त्यांना मिळालेली असताना एवढ्या अनुभवी व्यक्तीला या निवडणुकीत डावलण्यात आल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

संस्थाचालकाची मते वळविण्यासाठी प्रा.सावंत याचा उपयोग करुन घेण्याचा विसर भाजपसारख्या पक्षाला कसा पडला असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. प्रा.सावंत हे एकाही ठिकाणी प्रचारात दिसले नाही, त्यामुळे शंका निर्माण केली जात आहे. पराभवाची कारणमिमांसा करताना या मुद्द्याचाही विचार करणे भाजपाला क्रमप्राप्त ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT