Shiv Sena : तांबेंच्या निमित्ताने मामांची जिरवता येईल काय ? असा डाव असावा..!

Shiv Sena Uddhav Thackeray Slams Bjp : शुभांगी पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना चांगलीच टक्कर दिली.
Shiv Sena MP Sanjay Raut Latest Marathi News
Shiv Sena MP Sanjay Raut Latest Marathi News Sarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Uddhav Thackeray Slams Bjp : नुकत्याच झालेल्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकामध्ये भाजपला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत भाजपला दोन विद्यमान आमदार गमवावे लागले आहेत. यात अमरावती पदवीधरमधून रणजित पाटील यांचा, तर भाजप पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव झाला.

विधानसभेतील भाजपच्या पराभवावरुन शिवसेनेचे मुख्यपत्र 'सामना'तून टीकेचे बाण सोडले आहेत. "आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचे आहेत.ही तर सुरुवात आहे," अशा शब्दात शिवसेनेनं शिंदे –फडणवीस सरकारला आव्हानचं दिलं आहे.

भाजप-मिंधे सरकारला चपराक

"पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ म्हणजे भाजपची मक्तेदारी राहिलेली नाही व विधान परिषद निवडणुकीचे ताजे निकाल ही भाजप-मिंधे सरकारला चपराक आहे, नवख्या शुभांगी पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना चांगलीच टक्कर दिली. येथे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, भाजपच्या उधार-उसनवारीच्या राजकारणाची, असेही अग्रलेखात म्हटलं आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut Latest Marathi News
Nashik News : पदवीधरांनो, तुम्ही अज्ञानी, अशिक्षित आहात का ? नेटकऱ्यांचा सवाल ; मतपत्रिकांवर शेरोशायरी अन्..

"पदवीधर-शिक्षकांनी दिलेला हा कौल म्हणजे महाराष्ट्राचे ताजे जनमानस आहे. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला. पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राजकीय वर्चस्व.तरीही भाजप पराभूत होतो," अशा शब्दात ठाकरे गटाने भाजपला टोला लगावला आहे.

सत्यजीत तांबे हेच काँग्रेसचे उमेदवार

"काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वास हा नगरचा तिढा शांत डोक्याने व सन्मानाने सोडवता आला असता. झाकली मूठ तशीच ठेवून सत्यजीत तांबे हेच काँग्रेसचे उमेदवार असा पवित्रा घेता आला असता. पण तांबे यांच्या निमित्ताने मामांची जिरवता येईल काय ? असा डाव कदाचित असावा. त्यात किती तथ्य ते त्यांनाच माहीत, पण शेवटी ऐन वेळेस अपक्ष शुभांगी पाटील यांच्या पाठिंब्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला व त्यांच्या विजयासाठी शर्थ करूनही सत्यजीत तांबे हे विजयी झाले," असे अग्रलेखात स्पष्ट केलं आहे.

'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे..

  • काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वास हा नगरचा तिढा शांत डोक्याने व सन्मानाने सोडवता आला असता.

  • झाकली मूठ तशीच ठेवून सत्यजीत तांबे हेच काँग्रेसचे उमेदवार असा पवित्रा घेता आला असता.

  • ऐन वेळेस अपक्ष शुभांगी पाटील यांच्या पाठिंब्याचा निर्णय आघाडीने घेतला व त्यांच्या विजयासाठी शर्थ करूनही सत्यजीत तांबे हे विजयी झाले.

  • राष्ट्रवादीही मनाने तांबे यांच्याबरोबर होती काँग्रेसचा मोठा गट तांबे यांच्या मागे उभा राहिला.

  • भाजपने येथे उमेदवारच उभा केला नाही आणि तांबे हे शेवटपर्यंत ‘मी काँग्रेसवालाच’ असे सांगत राहिले.

  • नवख्या शुभांगी पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना चांगलीच टक्कर दिली.

  • येथे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, भाजपच्या उधार-उसनवारीच्या राजकारणाची

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com