Tanaji Sawant Sarkarnama
मराठवाडा

Tanaji Sawant Vs Omraje Nimbalkar : तानाजी सावंतांनी खासदार ओमराजेंवर का सोडला बाण?

Loksabha Election 2024 : कडवी झुंज की नुरा कुस्ती आहे हे येणारा काळच सांगणार

सरकारनामा ब्युरो

शितल वाघमारे -

Dharashiv : धाराशिव शहराचं मध्यवर्ती ठिकाण, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गर्दी हजारो लोकांची. तेवढ्यात एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या खांद्यावर हात टाकलेले सर्वांनी पाहिले. हा खांद्यावर टाकलेला हात मैत्रीचा, प्रेमाचा, वडीलकीचा होता की राजकीय समीकरण जुळून घेण्याचा होता, कुणाला माहिती आहे. त्याबद्दल ते दोघेही बोलले नाहीत.

ते एवढेच म्हणाले की,एकमेकांशी काय सतत भांडणच करत राहायचं का? असं म्हणून त्यांनी वेळही घालवली. इतके निकोप संबंध जपणारे पालकमंत्री अचानक महायुतीच्या पहिल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार ओमराजे यांच्यावर का टीका केली ? मग खासदारांना तीव्र शब्दांमध्ये शब्दाचे बाण सोडून घायाळ करणाऱ्या पालकमंत्री सावंत यांना खासदार ओमराजे(Omraje Nimbalkar) यांच्या सोबत राजकीय कुस्ती खेळायची की पडद्याच्या मागे सुरू असलेल्या डावाचा वेगळा अंक त्यांनी कालच्या भाषणातून दाखविला.

महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टी हे दोन प्रमुख पक्ष 14 घटक पक्षांपैकी जास्त दावेदार आहेत. त्यामुळे भाजप कमळावर लोकसभा निवडणूक लढविण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार.पालकमंत्री सावंत यांचे पुतणे यांचा एक फोटो भावी खासदार म्हणून व्हायरल झाला आहे.

हा व्हायरल झालेला फोटो हा चुकीचा आहे किंवा अशा प्रकारची मागणी केलेली नाही. असा कुठलाही खुलासा सावंत(Tanaji Sawant) यांच्या गटाकडून आलेला नाही. त्याचा अर्थ ते इच्छूक आहेत. असेच त्यांनी समाज माध्यमातून भासवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मग प्रतिस्पर्धी खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात सावंतांच्या कुटुंबातील व्यक्ती उभा करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे समर्थनही घ्यावे लागणार. यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सोबत जुळवुन घ्यायला हवे आणि ओमराजे निंबाळकर यांना टिकेचा धनी बनवायला हवं.

यासाठी तर त्यांनी पहिल्याच जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांना आव्हान दिले नाही. जर हे आव्हान खरे असेल तर दोन मातब्बर राजकारणाची कुस्ती पाहायला मिळणार. कारण दोघे अस्सखलित एकमेकांचे उट्टे काढण्यात माहीर आहेत. यापूर्वीही त्याचा प्रत्यय अनेकांनी अनेक वेळा घेतलेला आहे.

आता तर त्यांनी थेट आव्हान खासदार ओमराजे यांना दिला आहे. पैज ही लावली आहे. केलेले एकही काम दाखवून द्या. यावर खासदार ओमराजे यांनीही सावंत यांना प्रतिआव्हान दिले आहे. योग्य वेळी योग्य उत्तर देऊ. आताही योग्य वेळ केव्हा येणार हे त्यांनाच माहीत. आता ही खरोखर या दोघांमध्ये कडवी झुंज की नुरा कुस्ती आहे हे येणारा काळच सांगेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT