Devendra Fadnavis, Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : हत्या प्रकरणात सगळ्यांना 'मकोका'मग वाल्मीक कराड हे नाव कसे सुटते?

Why was MCOCA not imposed on Valmik Karad - Ambadas Danve's question to the government : काल धाराशीव येथे झालेल्या आक्रोश मोर्चात भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही वाल्मीक कराडला 'मकोका' का लावला नाही? असा सवाल सरकारला केला होता.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींना'मकोका'लावला, मग वाल्मीक कराड हे नाव यातून कसे सुटते? असा सवाल विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकाला विचारला. हत्या प्रकरणातील आरोपींना मकोका लावताना सरकार 'सलेक्टिव्हिझम' करतयं का? असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केला.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी घेतला. त्यानूसार वाल्मीक कराड वगळता इतर सर्व आरोपींवर 'मकोका'लावण्यात आला. वाल्मीक कराड हाच या सगळ्या खून प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय.

दररोज वाल्मीक कराड याचे निरनिराळे कारनामे बाहेर येत आहेत. असे असताना वाल्मीक कराड याच्यावर 'मकोका' लावण्यात आलेला नाही. या संदर्भात काल धाराशीव येथे झालेल्या आक्रोश मोर्चात भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही वाल्मीक कराडला 'मकोका' का लावला नाही? असा सवाल सरकारला केला होता.

त्यानंतर शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी 'एक्स'वरील प्रतिक्रियेतून सरकारच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात 'मकोका' लावण्यासाठी सरकार 'सेलेक्टिव्हिजम'करतंय. सगळ्यांना मकोका लावला मग वाल्मीक कराड हे नाव कसे यातून सुटते!

शिवाय खंडणी आणि खुनाच्या संबंधित झालेला तपास आता सरकार किंवा सीआयडीने लोकांपुढे मांडायला हवा. मुख्यमंत्री बीड,परभणी प्रकरणात सर्वांचे सहकार्य मागतात मग सर्वांच्या शंकांचे निरसन करणे, हे पण तर सरकारचे काम आहे. आता तपासात काय समोर आलं आहे हे न सांगणे लोकांच्या संयमाची परीक्षा घेणारे ठरेल, असे दानवे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT