Anjali Damania : वाल्मिक कराडला कोण वाचवतंय; आठव्या आरोपीला मकोका का लावला नाही? अंजली दमानियांचा सवाल

Santosh deshmukh Murder Case : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारला घेरले आहे. वाल्मिक कराडला कोण वाचवतंय, मकोका का लावण्यात आला नाही, असा सवाल दमानिया यांनी केला.
walmik karad, anjali damania
walmik karad, anjali damania Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक महिना उलटून गेला आहे. या हत्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे एसआयटीने हाती घेतल्यानंतर तपास कामाला वेग आला आहे. या खून प्रकरणांनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे.

या प्रकरणातील आठ पैकी सात आरोपीवर शनिवारी मकोका लावण्यात आला. दुसरीकडे संशयाची सुई असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला नाही. त्यामुळे आता तोच धागा पकडून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारला घेरले आहे. वाल्मिक कराडला कोण वाचवतंय, मकोका का लावण्यात आला नाही, असा सवाल दमानिया यांनी केला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. यामधील सात आरोपींना मकोका लावण्यात आला. खून झाल्यापासूनच नाही तर त्याअगोदर सुद्धा हे आरोपी संघटित गुन्हेगारी करत असल्याचे समोर आले होते. पण आरोपींनी हे कृत्य कुणाच्या इशाऱ्यावरून केले यावरून आता पुन्हा वाद उफळला आहे. बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी संशयाची सुई थेट वाल्मिक कराडकडे वळवली आहे. आता तोच धागा पकडून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सरकारला धारेवर धरत कराडला कोण वाचवतंय असा सवाल केला आहे.

walmik karad, anjali damania
Santosh Deshmukh Murder Case : बीड पोलिस, 'CID', 'SID'कडून निसटला 'हा' गंभीर मुद्दा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 'अ‍ॅक्शन मोड'वर

प्रसार माध्यमाशी बोलताना दमानिया म्हणाल्या, सात आरोपींवर मकोका लावला. पण आठव्या आरोपीला, जो व्हिडिओ कॉलवर अजून मारण्यास सांगत होता, तो कसा सुटला असा सवाल दमानिया यांनी केला आहे. त्याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत नाही का? असा सवाल दमानिया यांनी केला. हा आरोप करीत असताना त्यांनी गृहमंत्रालयावर ताशेरे ओढले आहेत.

walmik karad, anjali damania
Santosh Deshmukh Murder Case : बीड पोलिस, 'CID', 'SID'कडून निसटला 'हा' गंभीर मुद्दा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 'अ‍ॅक्शन मोड'वर

मे महिन्यापासून याप्रकरणात आवादा कंपनीकडून सुदर्शन घुले, विष्णू चाटेसह इतर आरोपींची नावे येत होती. तर त्याचवेळी कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला. मे महिन्यापासून ते डिसेंबर 2024 पर्यंत काहीच कारवाई केली नाही. त्याच वेळी कारवाई केली असती तर संतोष देशमुख जिवंत असते, असेही दमानिया म्हणाल्या.

walmik karad, anjali damania
Devendra Fadnavis : राणें-खाडेंची विधाने ठरणार का फडणवीसांच्या वाटेतले काटे?

यावेळी दमानिया यांनी राज्य सरकरला टार्गेट केले. वाल्मीक कराड हा सरकारचा जावई असल्यासारखा त्याला वागवला जात आहे, असे दमानिया म्हणाल्या. कराड यांचं सगळ्यांबरोबर चांगलं गणित आहे. त्याच्यावर धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. जोपर्यंत दबाव आहे, तोपर्यंत वाल्मिकवर मकोका लावण्यात येणार नाही, असा आरोपही त्यांनी केला.

walmik karad, anjali damania
Satej Patil : सतेज पाटलांचे मोठे विधान; म्हणाले, 'प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, वेगळे लढल्याने...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com