Manoj Jarange Patil, Rajendra Raut Sarkarnama
मराठवाडा

Rajendra Raut : जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली, मराठा आमदार पाडून दिलीप सोपल यांना निवडून आणणार का? राऊतांचा हल्लाबोल

Rajendra Raut, Manoj Jarange Patil : "एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यापैकी कोणाचीही चूक दाखवा आम्ही त्यांना बोलू. शंभर-पन्नास मतं असलेल्या समाजालाही कोणी दुखवत नाही. मग सहा कोटी मराठा समाजाला दुखावण्याचं धाडस कोणामध्येच नाही, त्यामुळे सत्ताधारी तरी ते धाडसं कसं करतील?"

Jagdish Patil

Maratha Reservation News : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता जरांगे पाटलांना मराठा समाजाचा आमदार पाडून दिलीप सोपल यांना (Dilip Sopal) निवडून आणायचा विचार केला आहे का? मनोज जरांगेना कोणाची सुपारी मिळाली? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

शिवाय जरांगे पाटलांच्या आवाहनामुळे लोकसभेत विरोधकांना झुकतं माप गेलं. त्यामुळे आता विरोधकांकडून ओबीसीतून (OBC) आरक्षणाबाबत मागावे, ही त्यांची जबाबदारी आहे, असंही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राऊत विरुद्ध जरांगे पाटील यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राजेंद्र राऊत नेमकं काय म्हणाले?

राजेंद्र राऊत म्हणाले, "मराठा समाजाचा आमदार पाडून दिलीप सोपल यांना निवडून आणायचा विचार जरांगे पाटलांनी केला आहे का? जरांगेना (Manoj Jarange Patil) कोणाची सुपारी मिळाली? सह्याद्री अतिथी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये ओबीसीचा विषय न काढता मराठा आरक्षण द्यायचे. मात्र, मनोज जरांगेंचा आधीचा मुद्दा सगेसोयऱ्याचा होता. त्यानंतर ओबीसीचा मुद्दा त्यांनी काढला. विरोधी पक्षाचे नेते ओबीसीतून आरक्षण सोडून बोला असं सातत्याने सांगत आहेत.

त्यामुळे जरांगे यांनी सरकारला ज्याप्रमाणे ओबीसीतून मागणी करत आहेत. त्याचप्रमाणे विरोधकांकडे देखील मागणी करावी," असं आवाहन राऊत यांनी केलं. शिवाय जरांगे यांच्या आवाहनामुळे लोकसभेत (Lok Sabha) विरोधकांना झुकतं माप गेलं. त्यामुळे आता त्यांची यांची जबाबदारी आहे की, विरोधकांकडून ओबीसीतून आरक्षणाबाबत मागणी करावी. विरोधकांनी याबाबत लिहून दिलं तर आमचा विषय संपेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं

मराठ्यांना दुखावण्याचं धाडस कोणामध्ये नाही

तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजितदादा यापैकी कोणाचीही चूक दाखवा आम्ही त्यांना बोलू. शंभर-पन्नास मतं असलेल्या समाजालाही कोणी दुखवत नाही. मग सहा कोटी मराठा समाजाला दुखावण्याचं धाडस कोणामध्येच नाही, त्यामुळे सत्ताधारी तरी ते धाडसं कसं करतील? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मनोज जरांगेना सोपल यांचे समर्थक जाऊन सातत्याने भेटतात आणि माझ्या विरोधात काहीही सांगतात. त्यामुळे मराठा समाजाचा आमदार पाडायचा आणि सोपलाला निवडून आणायचं असा विचार मनोज जरांगे पाटलांनी केलाय का? मनोज जरांगे पाटलांना कोणी काही बोललं की ते लगेच याच्याकडून सुपारी मिळाली त्याच्याकडून मिळाली असं म्हणतात.

मग आम्ही असं बोललं की त्यांना राग येतो. जरांगेना कोणाची सुपारी मिळाली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? जरांगे पाटलांना प्रश्न विचारला म्हणून त्यांनी चिडू नये. कारण आता ते मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत. सार्वजनिक जीवनात काम करताना आपण मालक राहिलेलं नसतो जनता मालक असते, असंही ते यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT