SP Kumar Chinta Sarkarnama
मराठवाडा

Yavatmal Missing Girls : गायब 34 मुलींचं गूढ कायम; कुरेशी दाम्पत्याबाबत पोलिस अधीक्षकांकडून धक्कादायक माहिती समोर!

Police reveal shocking details in Yavatmal missing girls case; five booked in child marriage probe, big disclosure on Qureshi couple : यवतमाळ राळेगाव इथल्या गायब 34 मुलींबाबतच्या प्रकरणात कुरेशी दाम्पत्याबाबत पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला आहे.

Pradeep Pendhare

Yavatmal missing girls case : यवतमाळ राळेगाव इथल्या गायब झालेल्या 34 मुली, बालविवाह आणि कुरेशी दाम्पत्यांची सहभाग यावर भाष्य करताना पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी मोठे खुलासे केले आहेत. गायब झालेल्या मुलींबाबत कुरेशी दाम्पत्यांचा अजून कुठेही सहभाग आढळलेला नाही. तसंच शोषणा देखील तक्रार नाही. विशेष म्हणजे, गायब झालेल्या मुलींची अजून नावे समोर आलेली नाहीत.

परंतु बालविवाह प्रकरणात पाच जणांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. कुरेशी दाम्पत्याचा याच्याशी कोणताही संबंध नाही. परंतु मजहर कुरेशीविरोधात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली.

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता म्हणाले, "राळेगावमध्ये बालविवाह होणार होता. मुलगी साडे पंधरा वर्षांची, तर तरुण 44 वर्षांचा होता. हे सर्व आदिवासी समाजाचे होते. माहिती मिळताच कारवाई केली अन् गुन्हा दाखल केला. हे प्रकरण वेगळ असताना, ते पुढे मिक्स झालेलं आहे."

राळेगावमध्ये कल्याणी कुरेशी आणि तिचा पती मजहर कुरेशी आहे. हे दाम्पत्य लग्न जुळवण्याचे काम करतात. आदिवासी मुलींचे लग्न केल्याचा तपासात अजून काही आढळले नाही. पण इतर समाजाच्या मुलींचे लग्न जुळवले आहेत. चंद्रपूर, नागपूर (Nagpur), परभणी, जालना, औरंगाबाद इथं मुलींचे लग्न या कुरेशी दाम्पत्याच्या मध्यस्थीने झाले आहेत. पण हे वेगळं प्रकरण आहे. यात अजून कुठेही धर्मांतराची किंवा शोषणाची तक्रार नाही, असे कुमार चिंता यांनी म्हटलं.

मजहर कुरेशी याची पत्नी हिंदू आहे. पण धर्मांतराचा प्रकार कुठेही उघडकीस आलेला नाही. परंतु गायब 34 मुलींच्या चौकशीत खोलवर तपास सुरू राहणार आहे. पुढील आठ दिवसांत पोलिसांकडून, यावर कायम तपास सुरू राहील. या प्रकरणात असलेल्या संशयितांची आर्थिक व्यवहार, मोबाईल काॅल रेकार्ड देखील तपासणार आहोत, असे कुमार चिंता यांनी सांगितलं.

मजहर कुरेशी याच्या घरी तलवार आढळली आहे. त्यानुसार त्याच्याविरोधात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पण शोषणा संदर्भात कोणतीही तक्रार समोर आलेली नाही. जर तक्रार येते, तर आम्ही कारवाई करू, असे सूचक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी सांगितले.

रेकाॅर्डवरील आकडेवारी

दरम्यान, गायब झालेल्या मुलींच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, काही संघटना, महिलांकडून मुली बेपत्ता असल्याची माहिती येत आहे. रेकाॅर्डवर तपास केल्यावर 2025 मध्ये 38 मुली बेपत्ता होत्या. त्यापैकी 37 मुलींना शोधून आणण्यात यश आलं आहे. 2025 मध्ये 14 मुलींचे अपहरण झाले होते. त्यातील 12 मुलींना शोधण्यात यश आलं आहे. 2026मध्ये नऊ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील आठ जणींचा शोध लागला आहे. दोन अपहरणाचे प्रकरण तपासात निकाली निघाले आहेत, अशी माहिती कुमार चिंता यांनी दिली.

गायब 34 मुलींबाबत तक्रारी नाहीत

'आता गायब असल्याच्या 34 मुलींबाबत, पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रारी नाहीत. त्यांच्या नावांची देखील माहिती समोर आलेली नाही. तरी देखील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, आम्हाला देखील यात शंका येत आहे की, या गायब झालेल्या मुलींविषयी तक्रारीच झालेल्या नाहीत. याबाबत पोलिस खोलवर तपास करणार आहे. काही निष्पन्न झाल्यास, कारवाई होईल. समोर काही आढळल्यास, मग तो कोणीही असू आम्ही सोडणार नाही,' असे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT