34 Missing Girls Yavatmal : आदिवासी मंत्र्यांच्या मतदारसंघात खळबळ; 34 मुली बेपत्ता; भाजपचा पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा, नगरपालिकेची 'बुलडोझर अ‍ॅक्शन'

BJP stages protest at police station in Yavatmal, names suspects and demands immediate action in the case of 34 missing girls from Ralegaon : यवतमाळमधील राळेगाव शहरासह तालुक्यातून बेपत्ता झालेल्या 34 आदिवासी मुलांच्या शोधासाठी भाजपने पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला होता.
34 Missing Girls Yavatmal
34 Missing Girls YavatmalSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal missing girls : राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईक यांच्या मतदारसंघात यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातून गेल्या सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्या आहेत.

यावरून भाजप आक्रमक झाली असून, जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. दरम्यान, राळेगाव नगरपालिकेनं संशयिताने केलेल्या अतिक्रमणावर बुलडोझर चालवला. यामुळे राळेगाव शहरात तणावाचे वातावरण होते.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांचं केलेल्या लैंगिक शोषण, नाशिकमधील 'TCS' कंपनीतील लैंगिक अन् धर्मांतरप्रकरण, रवींद्र एरंडे याचे गाजत असलेले लैंगिक शोषण, अमरावती परतवाडा इथलं अयान अहमद याने अल्पवयीन मुलींचे (Schoolgirls) केलेलं शोषणावरून राज्य हादरलं आहे.

यातच यवतमाळमधून (Yavatmal) राज्याला हादरवून सोडणारा प्रकार समोर आला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्या असून, त्यामागे 'लव जिहाद'चा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

34 Missing Girls Yavatmal
34 Girls Missing : राज्य हादरलं! 34 आदिवासी मुली गायब; ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतरा’चा अँगल? भाजपचा गंभीर आरोप

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण या मुद्यावर चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. प्रफुल चव्हाण यांनी मानवी तस्करी, लव जिहादचा संशय व्यक्त केला. तसंच आदिवासी मुलींच्या पालकांना पैशाचं अमिष दाखवून हा प्रकार होत गंभीर आरोप केला.

34 Missing Girls Yavatmal
Baramati Bypoll Controversy : बारामतीत ‘नो एन्ट्री’, राहुरीत ‘फुल एन्ट्री’! गोपीचंद पडळकरांचा इशारा, “मी बोललो तर भूकंप येईल!”

भाजपने सांगितले संशयिताचे नाव

प्रफुल चव्हाण यांनी यावेळी पोलिसांनी संबंधित संशयिताचे नाव सांगून, राळेगावसह जिल्ह्यात अवैध धंद्यात त्याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्याकडे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.

संशयिताच्या अतिक्रमणावर बुलडोझर

पोलिसांशी झालेल्या चर्चेत, प्रफुल चव्हाण यांनी संशयिताचे नाव सांगत असतानाच, दुसरीकडे राळेगाव नगरपालिकेने, संबंधिताच्या अतिक्रमणावर बुलडोझर चालवला. जेसीबीच्या सहायाने नगरपालिकेने त्याचे पत्र्याचे शेड पाडून टाकले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. परिसरात जय श्रीरामच्या घोषणा होत होत्या.

आदिवासी मुलींच्या पालकांना आमिष

आदिवासी मुलींच्या पालकांना पैसेचे आमिष देऊन, फूस लावली जात आहे. ही गंभीर बाब असून, याबाबत गृह विभागाकडे याची माहिती दिली आहे. राज्य सरकार यावर गंभीर असून, यात 'लव जिहाद', 'धर्मांतर', असा अँगल असू शकतो. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com