Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला टप्पा संपत आला आहे. बीड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश भारतभूषण क्षीरसागर यांना मुस्लिम बहुल भागात मतदारांतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. शहरातील मोमीनपुरा भागात पदयात्रेला मोठी गर्दी जमली. अल्पसंख्याक समाजाला गृहीत धरणाऱ्यांनी ही गर्दी पहावी, असे आव्हान डॉ. योगेश क्षीरसागर यांनी विरोधकांना दिले.
उच्चशिक्षीत व पेशाने डॉक्टर असलेले डॉ. योगेश क्षीरसागर पाच वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. (Beed News) त्यांचे वडिल डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा राजकीय वारसा पुढे चालविणाऱ्या डॉ. क्षीरसागर यांना वडिलांनी शहरात केलेल्या विकास कामांचेही बळ आहे. पक्षाचे प्रमुख अजित पवार व पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठ्या विश्वास आणि अपेक्षेने डॉ. योगेश क्षीरसागर यांना महायुतीची उमेदवारी दिली आहे.
विशेष म्हणजे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत बीड मतदार संघात डॉ. सारिका व डॉ. योगेश क्षीरसागर दाम्पत्याने केलेल्या मेहनतीचाही फायदा आता डॉ. क्षीरसागर यांना होतोय. (NCP) दरम्यान, मतदार संघाच्या निवडणुकीत बीड शहराची मतदान मतदार संघातील एकूण मतदानाच्या निम्मे आणि त्यात अल्पसंख्या मतदानही लक्षणीय आहे. त्यामुळे डॉ. क्षीरसागर यांनी या भागावर लक्ष केंद्रीत केले आहे.
मोमीनपुरा भागात त्यांनी काढलेल्या पदयात्रेला नागरिकांची मोठी गर्दी होती. यादरम्यान ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले. नागरिकांसह व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचा गजर करण्याची ग्वाही दिली. शहरातील मोमीनपुरासह इतर भागात देखील डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गाठीभेटी घेतल्या. यापूर्वी मराठा, मुस्लिम, ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नावर डॉ.योगेश क्षीरसागर यांनी वेळोवेळी सकारात्मक भूमिका मांडलेली आहे.
दरम्यान, गेली 35 वर्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड शहराची सेवा केली. त्यांच्या हातून अल्पसंख्याक समाजाची अनेक कामे झाली. कब्रास्थान, दर्गा अशा स्थळांसह कोट्यावधींच्या निधीतून अनेक विकासकामे झालेली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. भारतभूषषण क्षीरसागर सक्रिय राजकारणात नसले तरी त्यांना आमचा समाज काहीच विसरू शकत नाही, अशा भावना अनेक मुस्लिम समाज बांधवांनी व्यक्त केल्या.
तर, बागवान समाजाच्या बैठकीतही डॉ. येागेश क्षीरसागर यांना साथ देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. बागवान समाज पंच कमेटी अध्यक्ष हाजी हाशम बागवान, उपाध्यक्ष हाजी हारून बागवान, टिपू सुलतान युवा मंचाचे अध्यक्ष इरफान बागवान, हाजी मुसा बागवान, हाजी अब्दुल रौफ बागवान, नाहेद बागवान, आयुब बागमार, इम्रान बागवान, हाजी जाफर बागवान, सोनू बागवान, फरहान बागवान आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीत डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यामागे ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.