Beed Assembly Constituency : `योगेश, तुझ्याकडे उत्कृष्ट लोकप्रतिनिधी बनण्याचे गुण`, अजित पवारांनी पाठ थोपटली

Appreciation of Yogesh Kshirsagar by Ajit Pawar : राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा मान डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे आहे. मात्र, क्षीरसागर कुटूंबातील अलिखीत नियमामुळे त्यांना विधानसभा क्षेत्रात पदार्पणावर मर्यादा आल्या.
Ajit Pawar-Yogesh Kshirsagar News Beed
Ajit Pawar-Yogesh Kshirsagar News BeedSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नगर पालिकेवर अपवाद वगहता 30 वर्षे एकहाती सत्ता ठेवणाऱ्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना कौटुंबिक मर्यादांमुळे विधानसभा किंवा परिषदेच्या रिंगणात उतरता आले नाही. मात्र, डॉ. योगेश क्षीरसागर यांनी हे चक्र भेदत वर्षभरातच बीड विधानसभा मतदार संघातून महायुतीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळविली. त्यांच्या राजकीय कौशल्याचे आता पक्षाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कौतुक केले आहे.

`योगेश तुझ्याकडे उत्कृष्ट लोकप्रतिनिधी बनण्याचे गुण आहेत, लोकांच्या प्रश्नांची जाण तुला आहे. आपल्या वडीलांप्रमाणेच तू सुध्दा जनसेवेत स्वतःला वाहून घेशील, याची मला खात्री आहे`, असा विश्वास अजित पवारांनी (Ajit Pawar) व्यक्त केला आहे. त्यांनी या संबंधी एक व्हिडिओ आपल्या स्वतःच्या विविध सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट करीत डॉ. योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केल्याने आता त्यांच्या युवा समर्थकांमध्येही चैतन्य निर्माण झाले आहे.

राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा मान डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे आहे. (Beed News) मात्र, क्षीरसागर कुटूंबातील अलिखीत नियमामुळे त्यांना विधानसभा क्षेत्रात पदार्पणावर मर्यादा आल्या. मात्र, मागच्या वर्षी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार व धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्विकारात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. डॉ. क्षीरसागर व त्यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांनी या काळात मतदार संघात विकास कामांसह विविध माध्यमांतून संपर्क ठेवला.

Ajit Pawar-Yogesh Kshirsagar News Beed
Ajit Pawar Meets Prakash Ambedkar : अजितदादा मोठा डाव टाकणार, प्रकाश आंबेडकरांची घरी जाऊन भेट; 'हे' आहे राजकारण

निवडणुकीत महायुतीच्या बीडच्या जागेसाठी शिवसेना - राष्ट्रवादीत रस्सीखेच आणि उमेदवारीसाठी पक्षात स्पर्धा असताना ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुटून डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. आता प्रचाराची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी डॉ. येागेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करणारी पोस्ट केल्याने त्यांच्या समर्थकांचाही उत्साह द्विगुणीत झाला आहे.

Ajit Pawar-Yogesh Kshirsagar News Beed
NCP : चुकीला माफी नाही! अजितदादांच्या 'राष्ट्रवादी'ने उचललं मोठं पाऊल, बापू भेगडेंसह आठ जणांवर कारवाई

दरम्यान, या पोस्ट केलेल्या व्हिडीओत डॉ. योगेश क्षीरसागर अजित पवारांबाबत बोलत आहेत. `दादांचे वर्क डिसीप्लीन आहे. दिलेला शब्द पाळण्याचे काम ते करतात. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात प्रत्येक काम दर्जेदार होते. दादा त्यावर चांगल्या प्रकारे मॉनीटरिंग करतात. दादांशी आमच्या वडीलांचे पारिवारीक संबंध होते. पण मगील पाच-सात वर्षे माझी आणि त्यांच्याशी कसलीच भेट नव्हती किंवा काही बोलणे देखील नव्हते.

दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा द्यायला त्यांच्या बंगल्यावर गेलो. त्यावेळी वाटले दादा आपल्याला ओळखणार नाहीत. पण नाही, दादांनी मला ओळखले. मी त्यांना म्हणालो, दादा तुमच्यासोबत काम करायला उत्सूक आहे. त्यांनी मला जवळ बोलावून घेतले. त्यानंतर दादांनी मला नंतर भेट म्हणून सांगितले. तिथून मी बाहेर पडलो. त्यानंतर मला माझ्या वडीलांचा फोन आला.

त्यांनी मला विचारले तू अजितदादांना भेटला का? मी म्हणालो हो, पण हे तुम्हाला कोणी सांगितले? त्यावर वडील म्हणाले, मला दादांचा फोन आला होता`. मला आश्चर्य वाटले. दादांची मी बर्‍याच वर्षानंतर भेट घेणं, तरीही दादांनी मला ओळखणं, त्यांनी माझ्या वडीलांना फोन करणं, त्यांची काम करण्याची ही टेक्नीक मला फार आवडली. त्यामुळे कधीच आम्ही दादाला विसरू शकत नाहीत, असे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com