Yogesh Kshirsagar-Sandeep Kshirsagar-Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar Beed Sabha : धनुभाऊ, बीडमध्ये तुम्ही लावलेल्या दिव्याचा उजेड पडला नाही; मात्र आम्हाला चटके बसले : क्षीरसागरांची खंत

Yogesh Kshirsagar News : बीडचे भ्रष्ट आणि निष्क्रीय आमदारांनी विकासाचा एक चकार शब्दही त्या सभेत काढला नाही.

सरकारनामा ब्यूरो

Beed politics : धनुभाऊ, तुम्ही २०१९ ला बीडमध्ये दिवा तर लावला. पण त्या दिव्याचा उजेड कुठे पडलाच नाही. या दिव्याचे चटके मात्र आम्हाला, तुम्हालाही आणि बीडच्या जनतेलाही बसले आहेत, अशी खरमरीत टीका योगेश क्षीरसागर यांनी आपले बंधू आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर नाव न घेता केली. (Yogesh Kshirsagar's criticism of Sandeep Kshirsagar)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (ता. २७ ऑगस्ट) बीडमध्ये सभा होत आहे. त्या सभेत योगेश क्षीरसागर यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बीड शहरात नुकतीच सभा झाली. त्या सभेत विकासाच्या मुद्यावर चर्चा होईल, अशी आमची अपेक्षा होती. पण, बीडचे भ्रष्ट आणि निष्क्रीय आमदारांनी विकासाचा एक चकार शब्दही त्या सभेत काढला नाही.

योगेश क्षीरसागर म्हणाले की, राष्ट्रवादी परिवारात प्रवेश दिल्यानंतर मला माझ्या आजीच्या म्हणजेच केशरकाकूंच्या घरी आल्यासारखे वाटत आहे. कारण, माझी आजी केशरकाकू, माझ्या वडिलांनी या पक्षात आपली सर्व हयात घालवली आहे. या पक्षाच्या माध्यमातून माझ्या वडिलांनी शहराची सेवा केली आहे. त्यांचा कामाचा वसा मी पुढे घेऊन जात आहे.

माझ्यासोबत येणारे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या प्रवाहाला दिशा देण्याचे माझे कर्तव्य होते. हा प्रवाह थांबला असता तर त्याचं डबकं झालं असतं. पण मी केशरकाकूंचा नातू आहे. मी हे डबकं कसं होऊ देऊ. त्यासाठी आम्ही धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असेही योगेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात अजितदादांचा आणि बीडमध्ये धनंजय मुंडे यांचा कुणी नाद करायचा नाही. अलीकडे काही लोक म्हणतात की अजित पवार यांनी विचार सोडला. पण, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार जोपसण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार हेच करत आहेत. वंचितांना न्याय देणारा नेता म्हणून आज अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्र पाहत आहे, असे बाबूराव पोटभरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT