Uddhav Thackeray Hingoli Sabha : उलटा फिरून डसणाऱ्या हिंगोलीच्या गद्दाराला गाडून चिरडून टाका; उद्धव ठाकरे कडाडले

Santosh Bangar News : मटक्याचे अड्डे चालविणारा, उद्धटपणा करणाऱ्याला आपण हिंदुत्ववादी मानायचं का?
Santosh Bangar-Uddhav Thackeray
Santosh Bangar-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Hingoli News : हिंगोलीच्या गद्दाराला आपण आपण नाग समजून त्याची पुजा केली. पण, हा उलटा फिरून डसायला लागला. पायाखाली साप आला तर काय करायचं, हे तुम्हाला चांगलं कळतं. मटक्याचे अड्डे चालविणारा, उद्धटपणा करणाऱ्याला आपण हिंदुत्ववादी मानायचं का? आपल्याच लोकांवर उद्धटपणा करणार असेल तर त्याचा उद्धटपण गाडून चिरडून टाकावा लागेल आणि ते सांगण्यासाठी मी येथे आलो आहे, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. (Bury MLA Santosh Bangar: Uddhav Thackeray's order)

उद्धव ठाकरे यांची आज (ता. २७ ऑगस्ट) हिंगोलीत सभा झाली. त्या सभेत बोलताना ठाकरे यांनी बंडखोर आमदार संतोष बांगर यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, गद्दारांचा समाचार घेण्यासाठी सर्वसामान्य शिवसैनिक समर्थ आहेत. मी तुमच्यासाठी आलो आहे. गद्दार अनेक झाले पण हिंगोली कायम शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कायम राहिली आहे.

Santosh Bangar-Uddhav Thackeray
Thackeray Attack On BJP : भाजपला नेते बाहेरचे लागतात अन्‌ वडील माझे लागतात; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आताही काही गद्दार बेडकुळ्या दाखवत आहेत. पण, बेंडकुळ्यामध्ये जी हवा आहे, ती ताकद माझ्याकडे आहे. या गद्दाराला आपण नाग समजून त्याची पुजा केली. पण, हा उलटा फिरून डसायला लागला. तुम्ही गावाकडची आणि शेतातील लोकं आहात, पायाखाली साप आला तर काय करायचं, हे तुम्हाला कळतं. आणि तोसुद्धा उलटा फिरून डसणारा. अरे तुला पुंगी वाजवली आणि तुला दूध पाजलं. पण सर्व वाया गेलं, असेही ठाकरे यांनी बांगर यांना सुनावले.

माजी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, नाव हिंदुत्वाचं आणि धंदे सगळे..... हे असले धंदे करणारा हिंदू म्हणून घेऊ शकतो. हा माझा प्रश्न आहे. ह्याला आपण हिंदुत्व मानायचे का. मटक्याचे अड्डे चालविणाऱ्याला हिंदुत्ववादी मानायचं का. उद्धटपणा करणाऱ्या आपण हिंदुत्ववादी मानायचे का. आपल्याच लोकांवर उद्धटपणा करणार असेल तर त्याचा उद्धटपण गाडून चिरडून टाकावा लागेल आणि ते सांगण्यासाठी मी येथे आलो आहे.

Santosh Bangar-Uddhav Thackeray
Jaidatta Kshirsagar Indicate Statement : मी अजितदादांच्या सभेला जाणार नाही, पण योग्यवेळी योग्य निर्णय घेईन; जयदत्त क्षीरसागरांचे सूचक विधान

बीआरएसवर सडकून टीका

अब आयेगा किसान सरकार म्हणत काही उपरे महाराष्ट्रात येऊ पाहत आहेत. पण, आम्हाला उपऱ्यांची गरज नाही. भाजपची सुपारी वाजवायला येणार असतील, भाजपविरोधातील मते फोडणार असाल तर तुमचं घर अगोदर सांभाळा. कारण तुमच्या बुडाला सुरूंग लागला आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी बीआरएसला दिला.

Santosh Bangar-Uddhav Thackeray
Nitin Desai Case : सनी देओलला एक न्याय अन्‌ आमच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय का?; संजय राऊतांचा सवाल

कांदा उत्पादकांवर अन्याय

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर सरकारने अन्याय केला. निर्यात शुल्क ४० टक्के वाढवलं. शेतकऱ्यांना दोन पैसे जादा मिळवून देण्याचे काम सरकारने केले पाहिजे. तसेच, परवडणाऱ्या दारात ग्राहकांना कांदा दिला पाहिजे. ते काम सरकारचे आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Santosh Bangar-Uddhav Thackeray
Nanded Shivsena News : उद्धव ठाकरेंवर जेसीबीने पुष्पवृष्टी करू नका; नांदेड पोलिसांनी परवानगी नाकारली, शिवसैनिक संतप्त

सुनील केंद्रेकरांच्या अहवालाचा उल्लेख

उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सर्व्हे केला. एक लाख शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहेत. ती एकट्या मराठवाड्यातील आकडेवारी होती. त्यांचा तो पेरणीपूर्वीचा सर्व्हे आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना २५ हजार रुपये द्या, असा अहवाल त्यांनी सादर केला होता. मात्र, शेतकऱ्यांना मदत तर मिळालीच नाही. पण, केंद्रेकर यांना मात्र स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com