Black flags were shown to Eknath Shinde. sarkarnama
मराठवाडा

Eknath Shinde : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दाखवले काळे झेंडे, लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचा दावा

Congress Workers Black flags were shown to Eknath Shinde. : उपमुख्यमंत्री शिंदे जालना शहराच्या दौऱ्यावर आले होते. दत्त मंदिराकडून आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानाकडे जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

Roshan More

विष्णू नाझरकर

Eknath Shinde News : विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींना 2100 रूपये हप्ता देण्याची घोषणा करूनही सरकारने अद्याप हा हप्ता दिला नाही. लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचा आरोप करत जालना शहरातील मंठा चौफुली भागात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी सहाच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध नोंदवला.

उपमुख्यमंत्री शिंदे जालना शहराच्या दौऱ्यावर आले होते. दत्त मंदिराकडून आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानाकडे जात असताना मंठा चौफुली भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध नोंदवला .

निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता देण्याची घोषणा करूनही अद्याप लागू केली नाही. लाडक्या बहिणींची सरकारने फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

शहरातील नागरी समस्यांचा तात्काळ निपटारा करावा तसेच मोती तलावात तथागत भगवान गौतम बुध्दांचा प्रलंबित पुतळा बसवण्यात यावा. या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केल्याचे युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

यावेळी युवक काँग्रेसचे सचिव तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष शेषराव जाधव, दिपक गायकवाड,सुरज चक्रे, संतोष वाघमारे, सुखदेव उगले आदी आंदोलकांचा यामध्ये सहभाग होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT