Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत जयंत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले...

Jayant Patil Comment On Ncp Sharad Pawar State President : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काही दिवसांपूर्वी मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाची ही पहिलीच बैठक होती. याच बैठकीत शरद पवारांसह सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोरच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी करण्यात आली होती.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काही दिवसांपूर्वी मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाची ही पहिलीच बैठक होती. याच बैठकीत शरद पवारांसह सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोरच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली. या भाषणात त्यांनी पक्षाला वेळ देणारा, त्याचबरोबर मराठा समाजाबाहेरचा नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याची मागणीही लावून धरली. यावर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे.

माजी मंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापुरात शनिवारी (ता.25) मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्ष नवा प्रदेशाध्यक्षांसह विविध मुद्द्यांवर रोखठोक मतं मांडली. यावेळी त्यांनी पक्षातील संघटनात्मक बदलांवरही भाष्य केलं.

जयंत पाटील म्हणाले, आमच्या पक्षात काय बदल होणार माहिती नाही. पण बदल होईपर्यंत आपण प्रामाणिक काम केले पाहिजे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाबाबत मी आताच काही सांगू शकत नाही. पक्षाच्या अधिवेशनात वजनदार नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची भूमिका मांडली होती. त्यावेळी अनेकांनी तो मुद्दा उचलला. त्यावेळी मी कुणाच्या बुथवर किती मतं पडली याची मागणी केली,त्यानंतर ती मागणी मागे पडल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil
Jayant Patil On BJP : 'इतका मोठा विजय होऊनही भाजपला शरद पवारांची भीती..!' जयंत पाटलांनी शाहांना डिवचलं

जयंत पाटील म्हणाले, राज्य सरकारने केलेल्या एसटी भाडेवाढीवरही प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, सरकारने केलेली दरवाढ ही इतर योजनांची भरपाई करण्यासाठी केली आहे. महिलांची योजना सुरू ठेवली पाहिजे. साडे चौदा टक्के वाढ म्हणजे महिलांवर अन्याय आहे. गरिबांकडून एसटी काढून घेण्याचा राज्य सरकारचा आहे, असा आरोपही यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला.

'लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्यानंतर...'

बोगस होते म्हणून निकष लावतो असे चालणार नाही. बोगस असतील तर तपास करा, ते पैसे कोणाकडे गेले याची चौकशी झाली पाहिजे. मग या योजनेत भ्रष्टाचार झाला म्हणायचं का? निकष लावले म्हणजे चालणार नाही. सरकारला आता माघार घेऊन चालणार नाही. तुम्ही बांगला देशी महिलांना पैसे गेले म्हणजे तुम्ही दोषी आहात. असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

Jayant Patil
Bjp MLA On Jayant Patil : लायकी, क्षमता काढत फडणवीसांच्या लाडक्या आमदारानं जयंत पाटलांना डिवचलं

एकनाथ शिंदे यांचं काम झालं आहे, त्यांना देखील ते माहिती आहे आणि ज्यांच्यासोबत गेले त्यांना देखील माहिती आहे, अशी दावोस दौऱ्यावर जयंत पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. आपण 15 लाख कोटी गुंतवणूक केली म्हणत पण अजून बेरोजगारीचा प्रश्न आहे. ती बेरोजगारी का हटत नाही. आज उद्या कंपन्याचे भूमिपूजन होईल, तरुणांना रोजगार मिळतील इतकीच अपेक्षा आहे. इतक्या मोठ्या गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो, असंही पाटलांनी यावेळी म्हटलं.

हे गुंतवणूकदार देशातीलच आहेत, पण आम्हाला गुंतवणूक हवी आहे. दावोसला जाऊन गुंतवणूक करणे म्हणजे देशांत किती गुंतवणूक आहे,हे दाखवण्याचे ठिकाण आहे? पोषक वातावरण कसे आहे हे दाखवण्याचां प्रयत्न राज्य सरकारचा आहे. प्रयत्न होतायेत, पण कागदावर ही गुंतवणूक होऊ नये इतकीच अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Jayant Patil
Bajrang Sonawane : बजरंग सोनवणेंनी दिला मोठा इशारा; म्हणाले, ' बरेच काही दडलेले बाहेर काढणार'

बदलापूरच्या प्रकरणात अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर हा एन्काऊंटर फेक आहे, कोणाला तरी संरक्षण द्यायचे होते? कोणाला तर रॉबिन हुड बनायचं होतं? कोणाला तर नाव कमवायचं होतं? कदाचित तो अनेक गोष्टींचा साक्षीदार असेल म्हणून त्याचा एन्काऊंटर झाला असेल, असा दावा देखील जयंत पाटील यांनी केला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com