President Droupadi Murmu : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस राष्ट्रपती मुर्मू यांनी केले देशाला संबोधित, म्हणाल्या...

President Droupadi Murmu News : जाणून घ्या, आपल्या या विशेष संबोधनात राष्ट्रपती मुर्मू नेमकं काय म्हणाल्या आहेत?
President Droupadi Murmu
President Droupadi MurmuSarkarnama
Published on
Updated on

President Droupadi Murmu Speech: देशाच्या 76व्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येस द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, आजपासून 75 वर्षांपूर्वी 26 जानेवारीच्या दिवशीच भारताची राज्यघटना लागू झाली होती. जवळपास तीन वर्षांच्या चर्चा अन् विचारमंथनानंतर संविधान सभेने 29 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. यानिमित्त 26 नोव्हेंबर हा दिवस 2015 पासून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

तसेच, जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेला भारत(India) हा ज्ञान आणि विवेकाचा स्त्रोत मानला जात होता. परंतु भारताला एका अंधकारमय काळातून जावे लागले. वसाहतवादी राजवटीत अमानुष शोषणामुळे देशात अत्यंत गरिबी पसरली. असं राष्ट्रपती म्हणाल्या.

President Droupadi Murmu
Enemy Property and Saif Ali Khan : भारत सरकारने घोषित केलेली 'शत्रू संपत्ती' नेमकी कोणती अन् सैफचा काय आहे संबंध?

याचबरोबर, आजच्या दिवशी सर्वप्रथम आपण त्या वीरांचे स्मरण करतो, ज्यांनी मातृभूमीला परकीय राजवटीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी सर्वात मोठे बलिदान दिले. लोकांना त्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी काहींबद्दल माहिती आहे, पण बहुतेकजणांबाबत त्यांना माहिती नव्हती. असही राष्ट्रपती मुर्मू(President Droupadi Murmu) यांनी सांगितलं.

तसेच, आपल्या सांस्कृतिक वारशाशी असलेले आपले नाते आणखी घट्ट झाले आहे. सध्या होत असलेला प्रयागराज महाकुंभ देखील त्या समृद्ध वारशाची प्रभावी अभिव्यक्ती म्हणून पाहिला जाऊ शकतो. आपल्या परंपरा आणि चालीरीती जपण्यासाठी आणि त्यामध्ये नवीन ऊर्जा भरण्यासाठी संस्कृतीच्या क्षेत्रात अनेक प्रोत्साहनदायक प्रयत्न केले जात आहेत.'

President Droupadi Murmu
Youth Congress News : युवक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी शिवराज मोरे; प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना धक्का?

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, अलीकडील काळात इस्त्रोने अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. या महिन्यात इस्त्रोने पुन्हा एकदा आपल्या यशस्वी स्पेस डॉकिंग प्रयोगाने(SPADEX मिशन) देशाला अभिमानाने गौरवले आहे. ही क्षमता असलेला भारत आता जगातील चौथा देश बनला आहे.' असंही यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com