Chhatrapati Sambhaji Nagar : पाणीपुरवठा योजनेचे अंतिम बिल देण्याबाबत न्यायालयाचे आदेश असूनही रक्कम अदा न केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना वॉरंट प्राप्त झाले होते. तीन दिवसांत रक्कम अदा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यात म्हटले होते.
पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेत अर्थविषयक प्रक्रिया पूर्ण करत आज सायंकाळी 2 लाख 25 हजारांची रक्कम धनादेशाद्वारे भरल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले.
कचनेर तांडा येथे पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. सिकंदराबाद येथील वासुदेव झामुमल सजनानी यांनी हे काम घेतले होते. सहा फेब्रुवारी 1989 मध्ये करार झाला. त्यात कामाची किंमत 3 लाख 73 हजार 193 रुपये ठरली होती. काम पूर्णत्वात काही अडथळे आले. त्यावरून करार रद्द करून अंतिम बिल बनविले गेले नाही. त्याविरोधात कंत्राटदाराने न्यायालयाकडे दाद मागितली.
साडेचार लाख रकमेचा दावा केला. न्यायालयाने निरीक्षणे नोंदविली. 30 सप्टेंबर 1996 रोजी पाचव सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांनी दिलेल्या निर्णयाप्रमाणे कंत्राटदाराने मुदतवाढीचा अधिकृत अर्ज न केल्याने काही अंशी दोष, तथापि करार रद्द करण्याची प्रक्रिया बेकायदेशीर, सक्षम अधिकाऱ्याऐवजी कनिष्ठ अभियंत्याने दंड आकारला. अंतिम बिल न बनविणे ही विभागाची चूक, असे सांगितले.
अंतिम आदेश देऊन दावा अंशत: मंजूर केला. त्यानुसार सुरक्षा अनामत रक्कम 17 हजार 825 रुपये, डिझाइन चार्जेस 10 हजार, अंतिम बिल 7800 असे एकूण 35628 रुपये व दावा केल्याच्या तारखेपासून रक्कम मिळेपर्यंत 18 टक्के साधे व्याज प्रतिवर्ष खर्चासह देण्याचे आदेश दिले होते. त्या रकमेची पूर्तता केली गेली नव्हती. या अनुषंगाने मंगळवारी जिल्हा परिषदेला वॉरंट प्राप्त झाले होते.
तीन दिवसांत रक्कम अदा न केल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी व सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे वॉरंटमध्ये म्हटले होते, असे जिल्हा परिषदेतील सूत्रांनी सांगितले.
नोटीस प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. बुधवारी अर्थविषयक तरतुदीचे नियोजन केले गेले. सायंकाळी 2 लाख 25 हजार रुपयांचा धनादेश तयार करून सीईओ मिन्नू पी.एम. यांची स्वाक्षरी घेऊन जमा केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.