Sanjay Raut On Majhi Ladki Bahin Yojana Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'लाडक्या बहिणी'वर बोलणं संजय राऊतांना भोवलं, मध्य प्रदेशात गुन्हा दाखल

Mazi ladki bahin yojana Sanjay Raut Police : संजय राऊत यांच्या विरोधात मध्य प्रदेशमधील भाजपच्या महिला पदाधिकारी संतप्त झाल्या आहेत. चुकीची माहिती संजय राऊत पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Roshan More

Sanjay Raut News: विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरेल, असा दावा महायुतीचे नेते करत आहेत. तर, महाविकास आघाडीकडून महायुतीकडून ते पुन्हा सत्तेत आले तर तेच ही योजना बंद करतील, अशी टीका होते आहे.

मध्यप्रदेशातील माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे देणे बंद आहे. महाराष्ट्रातही ही योजना बंद होऊ शकते, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.

संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याच्या विरोधात मध्य प्रदेशमधील भाजपच्या महिला पदाधिकारी संतप्त झाल्या आहेत. चुकीची माहिती संजय राऊत पसरवत असल्याचा आरोप करत भाजप जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौधरी यांच्या तक्रारीवरून राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी मध्य प्रदेश सरकारने महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 1250 रुपये देण्याची घोषणा केली. तसेच महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा केले. या योजनेमुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार पुन्हा आल्याचा दावा केला जातो आहे. तर, ही योजनेतून महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बंद झाल्याचे संजय राऊत म्हणाले होते. त्यावरून त्यांची चुकीची माहिती पसरवल्याच्या गुन्हा त्यांच्यावर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशात दाखल केला आहे.

दिवाळीपूर्वीच भाऊबीज

लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे म्हणजेच ३००० रुपये महिलांच्या अकाउंटला पाठवण्यास सुरुवात झाली आहे.१० ऑक्टोबरपूर्वी महिलांना हे पैसे देण्यात येत आहे. दिवाळीपू्र्वीच भाऊबीजेची ओवाळणी मिळाली असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT