Mahayuti Election Strategy : महायुतीचे विधानसभेसाठी मायक्रो प्लॅनिंग; तीनही पक्षाची समन्वय समिती ठेवणार प्रचारावर ‘वॉच’

Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम हे समन्वयक करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळण्यासाठी महायुतीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहेत.
Mahayuti Leader
Mahayuti LeaderSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 October : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती जोरात कामाला लागली आहे. राज्यात असणारा समन्वय स्थानिक पातळीवरही राहावा, यासाठी सोलापूरमध्ये विधानसभानिहाय समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे तीनही पक्षाचे नेते समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील (Mahayuti) तीनही पक्षांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम हे समन्वयक करणार आहेत. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे प्रत्येकी एक नेता समन्वयाचे काम पाहणार आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळण्यासाठी महायुतीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहेत.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक पक्षाचा एक या प्रमाणे ३३ समन्वयक जिल्ह्यात काम पाहणर आहेत. लोकसभा निवडणुकीतील विस्कळीतपणा पुन्हा विधानसभा निवडणुकीत दिसून येऊ नये, ही जबाबदारी या समितीवर असणार आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठ भाजपतर्फे अनंत जाधव, शिवसेनेकडून तुकाराम मस्के, तर राष्ट्रवादीकडून अमोल कोटीवाले यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे शिवानंद पाटील, शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, तर राष्ट्रवादीतर्फे आबादीराजे यांची समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Mahayuti Leader
BJP Politics : मराठे नाराज, विधानसभेसाठी भाजपचा प्लॅन बी तयार?

माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे मनीष देशमुख, शिवसेनेतर्फे उमेश गायकवाड तर राष्ट्रवादीकडून उज्ज्वला पाटील आदी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. अक्कलकोटसाठी भाजपकडून प्रवीण शहा, शिवसेनेकडून संजय देशमुख, राष्ट्रवादीकडून प्रवीण खवतोडे हे समन्वयक असणार आहेत.

माढ्यात भाजपचे राजकुमार पाटील, शिवसेनेचे प्रियदर्शन साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनाथ माने हे विधानसभा निवडणुकीत समन्वयकाचे काम पाहणार आहेत. बार्शी भाजपकडून रणवीर राऊत, शिवसेनेकडून मनीष काळजे, तर राष्ट्रवादीकडून अश्पाक जमादार हे समन्वयकाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

मोहोळ मतदारसंघात भाजपचे शहाजी पवार, शिवसेनेचे सचिन सुरवसे, राष्ट्रवादीचे राज साळुंखे समन्वयकाचे काम पाहणार आहेत. करमाळ्यात भाजपकडून गणेश चिवटे, शिवसेनेकडून महेश चिवटे, राष्ट्रवादीकडून संजय घोडके हे समन्वयक असणार आहेत.

Mahayuti Leader
MVA News : मविआचा फॉर्म्युला ठरला; 'या' तारखेला होणार आता जागावाटपाची घोषणा

पंढरपूरमध्ये भाजपचे शशिकांत चव्हाण, शिवसेनेचे महेश साठे, राष्ट्रवादीकडून अस्लम चौधरी हे समन्वयकाचे काम पाहणार आहेत. सांगोल्यात भाजपचे चेतन केदार सावंत, शिवसेनेचे रतिफ नदाल, राष्ट्रवादीचे संजय मोरे यांंचा समन्वयकांमध्ये समावेश असणार आहेत. माळशिरसमध्ये भाजपकडून के. के. पाटील, शिवसेनेकडून राजकुमार येवरकर आणि राष्ट्रवादीकडून रमेश पाटील हे काम पाहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com