Prakash Ambedkar : विधानसभेसाठी आंबेडकरांची मोठी खेळी, वंचित ओबीसी अन् आदिवासींची नवी आघाडी

Prakash Ambedkar On New front of tribals and OBC : मराठा आंदोलनाचा फटकाही वंचितला बसला. या अनुभवातून वंचितने आता नवी मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यानुसार वंचित आदिवासी आणि ओबीसींना एकत्रित केले जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी एक नवी आघाडी तयार केली जात असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 10 Oct : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मोठा वाद सुरू आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातूनच मराठा (Maratha) समाजाला आरक्षण देण्याचा हट्ट धरला आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी या मागणीला तीव्र विरोध केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फायदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला झाला होता. या पार्श्वभूमीवर वंचित बहूजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकीत ओबीसींना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ओबीसींना अधिकाधिक जागा द्यायचं ठरवलं आहे. या माध्यमातून ते थेट शरद पवारांना आव्हान देत असल्याचं दिसत आहे. दहा वर्षांपूर्वी उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडीने 2014 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच चागंलाच दबदबा निर्माण केला होता.

त्यांच्या दावेदारीने मोठ्या प्रमाणात मत विभाजन झाले, त्याची मोठी किंमत काँग्रेसला (Congress) मोजावी लागली होती. मात्र, अलीकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र 'वंचित'ला फारसे महत्त्व मिळाले नाही. संविधान बदलणार असल्याच्या नरेटिव्हने त्यांचे सर्व प्रयत्न फसल्याचं पाहायला मिळालं.

Prakash Ambedkar
Top 10 News : फॉर्म्युला ठरला लवकरच होणार मविआचा 'जागावाटपाची घोषणा; विधानसभेसाठी भाजपचा प्लॅन बी तयार? - वाचा सविस्तर...

मराठा आंदोलनाचा फटकाही वंचितला बसला. या अनुभवातून वंचितने आता नवी मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यानुसार वंचित आदिवासी आणि ओबीसींना (OBC) एकत्रित केले जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी एक नवी आघाडी तयार केली जात असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.

नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, सत्तर वर्षांनंतर आम्ही राजकारणात बदल बघतोय. ओबीसी आता राजकारणात पुढे येत आहे. हे बघून आम्ही ओबीसींना निवडणुकीत प्रतिनिधित्व द्यायचं ठरवलं आहे. ओबीसी उमेदवारांची यादी देखील तयार आहे. काही जिल्ह्यात मुलाखती घ्यायच्या बाकी असल्याने आम्ही थांबलो आहोत.

Prakash Ambedkar
Uddhav Thackeray : आपले 40 आमदार सांभाळू न शकलेल्या ठाकरे, राऊतांना हवे काँग्रेसवर नियंत्रण!

आदिवासी सत्ता संपादनाच्या दोन परिषद झाल्या आहेत. आम्हाला केवळ आरक्षित जागेवर लढवतात असे आदिवासींचे मानणे आहे. त्यांनासुद्धा आम्ही अनारक्षित जागेवर लढवणार आहोत. सध्या राजकारणात मुस्लिम विरोधी चेहरा समोर आणला जातो असे वातावरण तयार करण्यात आले आहे.

त्याला काँग्रेससुद्धा बळी पडत आहे. राहूल गांधी मुस्लिम शब्द उच्चारायलाही घाबरत आहेत. मात्र, आम्ही मुस्लिमांना देखील उमेदवारी देणार असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com