Solapur News : शिंदे शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले सध्या चांगलेच चर्चेत असून कोकणात ऑपरेशन टायगरवरून केलेल्या वक्तव्यामुळे ते प्रकाश झोतात आहेत. आता त्यांनी थेट राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी आमदारावरच टीका केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. गोगावले यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर ही टीका त्यांनी राजन पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या टीकेवरून केली आहे.
गोगावले पंढरपूर येथे शिवजयंतीनिमित्त गेले होते. यावेळी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेतले. धक्कादायक म्हणजे त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांची भेट घेतली. दोनच दिवसांपूर्वी खरे यांनी लावलेल्या बॅनरची राज्भर चर्चा झाली होती. ज्यात गोगावलेंचा फोटो होता. मात्र शरद पवार यांचा फोटो किंवा तुतारीचे चिन्ह नव्हते.
आता सोलापूरच्या मातीवर पाय ठेवल्यानंतर गोगावले यांना राजन पाटील यांच्या दोन वर्षांपूर्वीच्या वक्तव्याची आठवण झाली. यानंतर गोगावले यांनी जोरदार हल्लबोल केला. गोगावले राजन पाटलांवर सडकून केलेल्या टीकेचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गोगावले यांनी, राजन पाटलांवर टीका करताना, त्याची तर आम्ही आय झ्याक केली असती, असे म्हणत शब्द आवरले. तर येथे महिला वर्ग असल्याने शब्द वापरत नाही असे म्हणत अति केलं की माती होतेच. गर्वाचे घर नेहमी खाली असतं, ज्याला उन्माद आला त्याचा येथे सत्यानाश झालाच म्हणून समजा असे म्हटले आहे.
लोकांनी राजन पाटील यांना संधी दिली होती. पण काय वक्तव्य तुमचं? काय वागणं तुमचं? पाटीलकी ना? शिवाजी राज्यांनी पाटलांचे चौरंग केले होते, असे म्हणत राजन पाटलांवर त्यांच्याच गावात टीका केली आहे. गोगावले यांनी त्यांच्याच गावात जाऊन थेट इशारा देताना, आज चांगला दिवस आहे. यामुळे वाईट माणसाचे नाव घेनं बरोबर नाही. आता उमेशने त्यांची आय झ्याक केली असून पुढच्या वेळी आम्ही करू, असे म्हटलं आहे.
गोगावले यांनी लग्नाच्या आधी मुलांच्या अशा गोष्टींना वाहवा करणं चुकीचं आहे. तुम्ही असे वक्तव्य करत आहात याचा अर्थ कित्येक महिलांना खराब केलं असेल, असे म्हटलं आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
यावेळी गोगावले यांना रायगडवरील शिवजयंतीला गैरहजर असण्याचे कारण विचारले असता त्यांनी, रायगडावर शिवाजी महाराजांची जयंती होत नाही ती शिवनेरीला केली जाते. शिवरायांची पुण्यतिथी आणि राज्याभिषेक रायगडावर होतो. आम्ही रायगडावर शिवजयंती कधीच साजरी केली नसल्यामुळे तिथे गेलो नाही, असे उत्तर दिले आहे.
तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कमाल खान वर कारवाई व्हायला पाहिजे. त्याबाबत चौकशी सुरू असून त्याच्यावर योग्य कारवाई होईल. युगपुरुष, देव देवतांबद्दल काही बदमाश आणि बेशरम लोक जे काही टीकाटिप्पणी करतात त्यांना जोड्यानेच हाणले पाहिजे. आता त्यासाठीच आम्ही कडक कायदा करण्याचे ठरवले असल्याचेही गोगावले यांनी म्हटलं आहे.
राजन पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपल्या भाषणात विरोधकांवर टीका केली होती. त्यांनी पाटलाच्या पोराला लग्नाच्या आधी तुझ्याएवढी बाळं असतात असे वक्तव्य केलं होतं. तर आता तू आमच्या पोरांना बाळ म्हणतो का? असा टोला लगावला होता. याच टोल्यावरून गोगावले यांनी राजन पाटलांचा समाचार घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.