Bharat Gogawale won : मंत्रि‍पदाचा कोट तयार म्हणणारे भरत गोगावले विजयी, कोकणात ठाकरेंना मोठा धक्का

Shivsena Deepak kesarkar Won sawantwadi Assembly Election 2024 : भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिल्याने माजी आमदार स्नेहल जगताप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून उद्धव ठाकरेंना साथ दिली होती.
Bharatshet Gogawale won
Bharatshet Gogawale wonsarkarnama
Published on
Updated on

Bharatshet Gogawale won : महाड मतदार संघात शिवसेनेचे भरत गोगावले 26 हजार 210 मतांनी विजयी मिळवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांचा पराभव केला.

महाड विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघामध्ये लोकसभेला महायुतीच्या उमेदवार सुनील तटकरे यांना मोठे लीड मिळाले नव्हते. त्यामुळे विधानसभेला या मतदारसंघात काय होणार याची उत्सुकता होती.

भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिल्याने माजी आमदार स्नेहल जगताप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून उद्धव ठाकरेंना साथ दिली. अपेक्षे प्रमाणे त्यांनाच भरत गोगावलेंच्या विरोधात उमेदवारी मिळाली.

Bharatshet Gogawale won
Balasaheb Thorat Loss : थोरातांचा पराभव, चार दशकांचा बुरूज ढासळला

महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले यांनी 2019 भरत गोगावले यांनी विजयाची हॅटट्रीक केली होती. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांचा 21 हजार 575 मतांनी पराभव केला होता. भरत गोगावले यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्याने भरत गोगावले यांची मंत्रि‍पदाची संधी हुकली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

निवडणुकीच्या आधी काही दिवस भरत गोगावले यांना एसटीचे अध्यक्षपद देण्यात आले. मात्र, अगदी अल्पकाळासाठी मिळालेल्या अध्यक्षपदावर मोठी काम करता येणे शक्य नव्हते.महाड मतदारसंघ काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, हे वर्चस्व संपवत शिवसेनेने आपले वर्चस्व मिळवले. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांनी येथे विजय मिळवला.

1990 ते 1999 दरम्यान प्रभाकर मोरे यांनी महाड मतदारसंघावर तीन वेळा विजय मिळवला. त्यानंतर 2004 मध्ये, काँग्रेसच माणिक जागताप यांनी हे महाड पोलादपूर मतदारसंघातून विजयी झाले होते. तर, 2009, 2014,2019 या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे भरत गोगावले यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

Bharatshet Gogawale won
Radhakrishna Vikhe Won Election : राधाकृष्ण विखेंचा दणदणीत विजय; म्हणाले, 'विजय जनतेला समर्पित'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com