EKnath shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena Leader joins BJP : एकनाथ शिंदेंच्या सेनेला मोठा धक्का! बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश; समीकरण बदलणार

Shiv Sena leaders joining BJP News : शिवसेनेलाच मोठा धक्का बसला असून बड्या नेत्याने शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभेचे अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडत सहा खासदारानी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर दुसरीकडे विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेत प्रवेश करताच त्यांची वर्णी लागली. त्यानंतर आता शिवसेनेलाच मोठा धक्का बसला असून मिरा भाईंदरमधील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जवळच्या बड्या नेत्याने भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता येथील राजकीय समीकरण बदलणार आहे.

मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मोठी घडामोड घडली. दहा वर्ष नगरसेविका असलेल्या माजी नगरसेविका नर्मदा वैती यांनी त्यांच्या शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवरील समीकरण बदलणार आहे. आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 ऑगस्टला पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना शहर संघटक प्रसाद सुर्वे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मिरा-भाईंदरच्या राजकारणाचा नर्मदा वैती यांना दीर्घ अनुभव आहे. त्यांनी २००७ ते २०१७ या दहा वर्षांच्या कालावधीत भाईंदर पूर्वेच्या नगरसेविका म्हणून काम केले आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या महिला व बालकल्याण उपसभापतीपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. गेली सार्वत्रिक निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली होती.

दरम्यान, कुठल्याही निवडणुका तोंडावर नसताना वैती आणि सुर्वे यांच्यासारख्या अनुभवी पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, या पक्षप्रवेशामुळे आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली मिरा-भाईंदरमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मिरा भाईंदर हा प्रामुख्याने शिवसेनेचे नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांचा मतदारसंघ असून त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणी अनेकवेळा भाजप आणि शिवसेनेमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यातच आता आमदार मेहता यांनी शिवसेनेचे नेते गळाला लावले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT