

Mumbai News : मुंबई महापालिकेत भाजपसोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या महापलिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला मोठी संधी होती. मात्र, ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली त्याचा फटका एकनाथ शिंदेंना बसला होता. दुसरीकडे त्यांच्या पक्षाकडे मुंबईत माजी खासदार राहुल शेवाळे यांच्याशिवाय पॉवरफुल चेहरा नाही. त्यामुळे शेवाळे यांच्याकडेच महापालिका निवडणुकीची सूत्रे सोपवली होती. मात्र, शेवाळे यांची रणनीती महापलिक निवडणुकीत सपशेल अपयशी ठरली होती. त्यानंतरच शिंदे यांनी मुंबईसाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार आता शिंदे यांच्याकडून येत्या काळात भाकरी फिरवून नव्याने पक्षात आलेल्या एका बड्या नेत्याकडे मुंबईच्या सेनेची धुरा सोपविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी काळात लवकर निवडणुका होणार नसल्यातरी शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आता नव्याने आलेल्या विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्याकडे सूत्रे देण्याची तयारी सुरु असल्याचे समजते. त्यासाठी आता शिवसेनेच्या बैठीकीत सचिन अहिर नेतेमंडळींना मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे येत्या काळात भाकरी फिरवण्यात येणार असल्याचे समजते.
मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांना नुकतेच सचिन अहिर यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे महापालिकेत येत्या काळात घेण्यात येणाऱ्या भूमिकेविषयी त्यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले आहे. अहिर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काम करीत असताना त्यांच्या वरळी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणले होते. याठिकाणी अहिर यांनी निवडणुक काळात अवलंबलेल्या रणनीतीमुळे मोठे यश मिळाले होते.
त्याचमुळे आता येत्या काळात मुंबई शहरावर एकहाती वर्चस्व प्राप्त करण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना जोरदार तयारी करीत आहे. दुसरीकडे त्यांना सचिन अहिर यांच्या रूपाने मुंबईवर कमांड असलेला मोठा नेता भेटला आहे. त्यामुळे अहिर यांच्या मार्गदर्शनखाली येत्या काळात संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काळात काही नव्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
एकेकाळी आदित्य ठाकरे यांच्या जवळचे नेते अशी सचिन अहिर यांची ओळख राहिली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठा दबदबा होता. त्यासोबतच काही काळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले आहे. त्यावेळी राज्यमंत्रिमंडळात मंत्री देखील होते. त्यामुळे त्यांना संघटनात्मक अनुभव मोठा आहे. त्याचमुळे येत्या काळात एकनाथ शिंदे यांनी मुंबई शिवसेनेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविणार असल्याचे समजते. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.