Rohit Pawar 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar : 'स्मारक होऊ नये यासाठी कोणाचा दबाव, तर नाही ना?' रोहित पवारांच्या प्रश्नानं सरकारची कोंडी

MLA Rohit Pawar had corresponded with the government for the Chhatrapati Shivaji memorial in the Arabian Sea : अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारबरोबर केलेला पत्रव्यवहार दाखवला 'सोशल' केला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक शोधण्यासाठी संभाजीराजे छत्रपती थेट अरबी समुद्राकडे गेले. राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारला त्यांनी एकप्रकारे आव्हान दिले.

संभाजीराजे छत्रपती यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकार पुरतं घायाळ झालं. हेच टायमिंग साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला खोचक प्रश्न करत कोंडी केली.

आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर याबाबत पोस्ट केली असून, तत्कालीन राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याचे फोटो शेअर केली आहेत. तसंच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाच्या संदर्भात दिलेल्या पत्र देखील शेअर केली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, "अरबी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन होऊन आठ वर्ष झाली. तरी देखील स्मारकाची एक वीट देखील रचली गेली नाही". छत्रपतींचे स्मारक होण्यास अडचणी का येतात? हे स्मारक होऊ नये यासाठी कोणाचा दबाव तर नाही ना? असे कितीतरी प्रश्न सर्वसामान्य शिवप्रेमींना पडले आहेत. यावर सरकारकडून उत्तर देईल, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

तत्कालीन राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन छत्रपतींच्या स्मारकासंदर्भात केलेला पत्रव्यवहार देखील दाखवला आहे. आमदार पवार यांनी जुलै 2022 मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती, तर वर्षभरानंतर जुलै 2023 मध्ये तत्कालीन राज्यपाल रमेश बैर यांची भेट घेतली होती. तरी देखील सरकारने कामासंदर्भात निष्क्रियता दाखवली. यावरून सरकार किती सिरियस आहे, हे दिसते, असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT