Devendra Fadnavis : संभाजीराजे अरबी समुद्रात; फडणवीस म्हणाले, ते कुणाचे वकील, याचाही निषेध करा!

Sambhajiraje Chhatrapti Shivaji Maharaj Arabian Sea : संभाजीराजे छत्रपती हे शिवाजी महाराजांचे स्मारक शोधाण्यासाठी अरबी समुद्रात गेले आहेत.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकाचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे. स्मारकाला विलंब होत असल्याच्या निषेधार्थ संभाजीराजे छत्रपती समुद्रात जलपूजन केलेल्या ठिकाणी स्मारकाचा शोध घेण्यासाठी रविवारी गेले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डिसेंबर 2016 मध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जलपूजनाचा दिमाखदार सोहळा पार पडला होता. पुढील काही दिवसांत त्याला आठ वर्ष पूर्ण होतील, पण अद्याप स्मारक उभे राहिले नाही. संभाजीराजेंनी रविवारी अरबी समुद्रात जात जलपूजन केलेल्या ठिकाणी स्मारकाचा शोध घेत प्रतिकात्मक निषेध केला.

Chhatrapati Shivaji Maharaj
Sambhajiraje Chhatrapati : शिवस्मारक शोधण्यासाठी निघालेल्या संभाजीराजेंना पोलिसांनी रोखलं; 'स्वराज्य'च्या कार्यकर्त्यांची धरपकड

संभाजीराजेंच्या या भूमिकेविषयी मीडियाशी बोलताना फडणवीस म्हणाले, समुद्रात शिवस्मारक झाले पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. संभाजीराजेंच्या इच्छेचा सन्मानच आहे. निश्चितपणे स्मारक झाले पाहिजे, ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. पण या स्मारकाविरोधात कोर्टात जाऊन स्थगिती आणणारे कोण, ते कुणाचे वकील आहेत, हेही बघितले पाहिजे.

काँग्रेस पक्षाचा अधिकृतपणे प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये म्हणून स्थगिती आणतात, याचाही निषेध संभाजीराजेंनी योग्य शब्दांत केला पाहिजे, असे आवाहन फडणवीसांनी संभाजीराजेंना केले. आम्ही कोर्टात भांडतो आहोत. आम्ही ते स्मारक कोर्टाकडून मंजूर करून घेऊ, असेही फडणवीसांनी ठामपणे सांगितले.

Chhatrapati Shivaji Maharaj
Rohit Pawar : फक्त निवडणूक वेळेवर होऊ द्या, तुम्हाला पराभवाचा पिक्चर दाखवणार...

पवारांचे त्या मागणीला समर्थन नाही

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच आरक्षणाची मर्यादा 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याबाबत भाष्य केले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, मराठा आंदोलक जी मागणी करत होते, त्याला पवारसाहेबांचे समर्थन नाही, हे यातून स्पष्ट झाले आहे. कारण त्यांची मागणी वेगळी आणि पवारसाहेबांनी सांगितलेले वेगळे. माझी प्रतिक्रिया विचारण्याऐवजी यावर त्यांना प्रतिक्रिया विचारा, असे म्हणत फडणवीसांनी अधिक बोलणे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com