Sadabhau Khot  Sarkarnama
महाराष्ट्र

Sadabhau Khot : आमदार सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता'

Political News : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी एका मुलाखतीत तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सरकारवर गंभीर आरोप केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीकडून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. राज्यातील प्रचार शिगेला पोहचला असून सत्ताधारी व विरोधकांकडून एकेमकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी एका मुलाखतीत तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सरकारवर गंभीर आरोप केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

आमदार सदाभाऊ खोत काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती तर काही ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली होती. त्यातच त्यांनी शनिवारी एका कार्यक्रमावेळी गंभीर आरोप केला आहे. 2012 मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सरकारने माझे एन्काउंटर करण्याचे षडयंत्र रचले होते, असा खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील वातावरण तापले आहे.

आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुलाखतीप्रसंगी मोठा गौप्यस्फोट केला. 2012 साली माझे एन्काऊंटर करण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. 2012 सालच्या तत्कालीन आघाडी सरकारवर त्यांनी हा आरोप केला आहे. तसेच शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणत सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) सोबत घेण्याचे त्यांनी समर्थन केलं आहे.

इंदापूरला 2012 साली उसाचं आंदोलन सुरू होते. चंद्रकांत नलवडे हा शेतमजुराचा पोरगा टेम्पोच्या आडोशाला उभं राहून आंदोलन बघत होता. पोलिसांनी समोरून जाऊन त्याला गोळी घातली. त्यावेळी मला येरवड्याच्या जेलमध्ये ठेवलं गेलं होतं. तेव्हा बाहेर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात तेव्हा सगळे रस्ते पॅक होते. मला तेव्हा पोलिसांनी आत येऊन सांगितलं की जामीन स्वीकारा आणि बाहेर येऊन सगळं शांत करा. मी जामीन स्वीकारून बाहेर आलो.

त्यानंतर तीन ते चार गाड्या बाहेर उभ्या होत्या . या गाडीत बसा, त्या गाडीत बसा मला असे पोलीस सांगत होते. मी विचार करत होतो, यांनी मला एवढ्या चांगल्या गाड्या बसायला कशा आणल्या. मी त्या डीवायएसपीचं नाव घेणार नाही. मला त्यांच्या नोकरीवर गंडांतर आणायचं नाही. त्यानं मला चालत-चालत हळूच सांगितलं की भाऊ जिथं-जिथं एक दोन ठिकाणी आंदोलनाची दंगल सुरु आहे, त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचे आहे, असे सांगत आणि तुमचं एन्काऊंटर करायचं आहे, असं खोत यांनी सांगितले.

दरम्यान, सदाभाऊ खोत काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. त्यांनी एका जाहीर सभेत खासदार शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. सोबतच ही टीका करताना त्यांनी शरद पवार यांच्या चेहऱ्यावर भाष्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर राज्यभरातून सडकून टीका झाली.

भाजपच्या नेत्यांनीही खोत यांच्या विधानावर असहमती दर्शवली होती. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरात खळबळ उडाल्यामुळे शेवटी खोत यांनी त्यांच्या विधानाबाबत जाहीर माफी मागितली होती.

त्यामुळे त्यांच्या विरोधातील वातावरण काही अंशी शांत झाले आहे. त्यानंतर खोत यांनी 2012 सालच्या तत्कालीन आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता काय कारवाई केली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT