Uddhav Thackeray Video : 'काळजी करू नको, मी बदला घेणार', उद्धव ठाकरेंनी भरसभेत दिला 'त्या' कार्यकर्त्याला शब्द

Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray promise : उद्धव ठाकरे म्हणाले, 'मनात आणलं तर गद्दार जागेवर ठेवणार नाही मुळासकट उखडून ठेऊ. राज्यात कायदा सुव्यवस्था नांदत असेल तर ज्यांनी हल्ला केला त्याच्यावर कारवाई केली पाहिजे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : लोहा कंधार मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर विरोधात लिहिले म्हणून त्याची बोटांवर वार करण्यात आला. त्याची बोटे कापण्यात आली, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्या कार्यकर्त्याला स्टेजवर बोलावले.

उद्धव ठाकरेंनी त्या कार्यकर्त्याला भर सभेत 'तू काळजी करू नको मी बदला घेणार' असे आश्वास दिले. 'मनात आणलं तर गद्दार जागेवर ठेवणार नाही मुळासकट उखडून ठेऊ. राज्यात कायदा सुव्यवस्था नांदत असेल तर ज्यांनी हल्ला केला त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. जर नसेल तर पोलिस बाजुला ठेवा आम्ही बघतो कोण आमच्यावर चालून येत आहेत ते.', असे देखील ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Aurangabd West Assembly Constituency : मी जनतेची कामे करणारा आमदार, मला कुणाची भीती नाही

'शिवसैनिकाच्या केसाला हात लावला तर तो हात जागेवर ठेवणार नाही. माननीय बाळासाहेबांची आम्हाला हीच शिकवण आहे. कोणाच्या अंगावर चालून जायचे नाही आणि कोणी चालून आला तर त्याला सोडायचे नाही', असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

लढायचे असेल तर मर्दा सारखे लढा. नामर्दा सारखे लढून नका. आमच्या सोबत मित्र पक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आहे. त्यांच्यसोब इन्कमटॅक्स, ईडी, पोलिस यांची युती आहे. माझ्या पदाधिकाऱ्यांच्या दडीपार करतायेत. 20 तारखेला निवडणूक झाल्यानंतर आमचे सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला तिघांना महाराष्ट्रातून तडीपार करू, असे चॅलेंज देखील उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना दिले.

ही लढाई एकट्याची नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, ही लढाई माझी एकट्याची, शिवसेनेची, शरद पवारांची, राहुल गांधी यांची नाही. ही लढाई तुमची (जनतेची) आहे. मी माझ्या भाषणाची सुरुवात महाराष्ट्र प्रेमी म्हणून करतो कारण ते महाराष्ट्र द्रोह करत आहेत. ते महाराष्ट्र लुटत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Sudhakar Khade : कुऱ्हाडीचा घाव अन् सांगलीत भाजप नेत्याची भरदिवसा हत्या, कोण होते सुधाकर खाडे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com