Maharashtra Assembly Election: नात्यात राजकारण..! 'आमदारकी'साठी कुठे पती-पत्नी तर कुठे बाप-लेक झुंजणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत नातलगमंडळी एकमेकांविरोधात उभी टाकल्याने ही निवडणुक चुरशीची झाली आहे. यामध्ये भाऊ-भाऊ, बाप-लेक, पती-पत्नी, चुलते-पुतणे यांच्यात लढती होणार आहेत.
Maharashtra Political leaders
Maharashtra Political leadersSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. त्यामध्ये काही ठिकाणी भाऊबंदकी एकमेकांविरोधात उभी ठाकणार आहे. महायुती व महाविकास आघाडीत राज्यात होणारी ही विधानसभेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

अहेरीमध्ये बाप-लेक, बारामतीमध्ये चुलते-पुतणे तर कन्नडमध्ये पती-पत्नी तर बीडमध्ये भाऊ आमने-सामने आले आहेत. पुसदमध्ये सख्खे भाऊ एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे राज्यातील या नातेवाईकांच्या या चुरशीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी 2014, 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नातलगमंडळी एकमेकांविरोधात उभी टाकल्याने ही निवडणुक चुरशीची झाली होती. यामध्ये भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, चुलते-पुतणे, दीर-भावजय यांच्यात रंगतदार लढती झालेल्या पाहवयास मिळाल्या होत्या. या वेळेसच्या निवडणुकीतही पुन्हा एकदा भाऊबंदकी आमने सामने आल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

अहेरीत बाप-लेकीमध्ये लढत

अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यामध्ये लढत होणार आहे. धर्मराव बाबांच्या कन्येने बंड करीत असून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला. त्यामुळे शरद पवार गटाच्या भाग्यश्री आत्राम आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम एकमेकाविरोधात निवडणूक लढणार आहेत.

बीडमध्ये चुलत भाऊ आमने-सामने

बीडमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात पहिल्यांदाच क्षीरसागर कुटुंबातील दोन चुलत भावासह अपक्ष म्हणून चुलते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने त्यांचे चुलतभाऊ योगेश क्षीरसागर यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या दोन बंधूमध्ये चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी चुलते जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता. यावेळेसही पुन्हा जयदत्त क्षीरसागर दोन पुतण्याच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

Maharashtra Political leaders
Devendra Fadnavis: दिवाळीत फडणवीसांनी पहिला 'बॉम्ब' फोडला! रवी राजा यांच्या भाजप प्रवेशानंतर दिले मोठे संकेत

पुसदमध्ये सख्खे भाऊ एकमेकांसमोर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नाईक कुटुंबातही फूट पडली. मनोहरराव नाईकांचा एक मुलगा आमदार इंद्रनील नाईक अजित पवारांसोबत आहेत तर त्यांचा मोठा मुलगा ययाती नाईक हा शरद पवारांसोबत आहे. त्यामुळे आता पुसद विधानसभा मतदारसंघातून दोन सख्खे बंधू एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत.

या मतदारसंघातील विद्यमान आमदार इंद्रनील नाईक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.तर दुसरीकडे इंद्रनील नाईक यांचे बंधू ययाती नाईक हे सुद्धा या मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Maharashtra Political leaders
Congress Politics : बंडोबांचा थंडोबा करण्यास काँग्रेसला 'नो इंटरेस्ट'!

कन्नडमध्ये पती-पत्नीत लढत

छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघात शिवसेनेकडून संजना जाधव निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचे पती व माजी आमदार हर्षवर्धन जाधव या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या पती-पत्नीमध्ये होत असलेल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

संजना जाधव या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या होत. त्यांनीच त्यांना महायुतीमधील शिवसेनेत प्रवेश करण्यास सांगितले होते. या मतदारसंघातून गेल्यावेळेस शिवसेनेचे उदयसिंह राजपूत विजयी झाले होते.

Maharashtra Political leaders
Maharashtra Congress: काँग्रेसचे स्टार प्रचारक ठरले; राज्यभरात 'या' 40 नेत्यांच्या होणार सभा

बारामतीमध्ये चुलते-पुतण्यात लढत

बारामती मतदारसंघात होत असलेल्या हायव्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून त्यांचे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या चुलते-पुतण्यातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी नणंदविरुद्ध भावजय अशी लढत झाली होती. त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव करीत बाजी मारली होती.

Maharashtra Political leaders
MVA Nagpur : शरद पवारांनी पंढरपूर, हिंगणा घेतले, आता पूर्व नागपूरचे काय होणार?

निलंग्यात चुलते-पुतणे आमनेसामने

त्याशिवाय निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याविरुद्ध त्यांचे चुलते अशोक पाटील-निलंगेकर अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. अशोक पाटील-निलंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली नाही.

यापूर्वी याठिकाणी झालेल्या आजोबा-नातू यांच्या लढतीत 2004 साली नातू संभाजी पाटील यांनी आजोबांना पराभूत केले होते. तर 2009 साली झालेल्या लढतीत आजोबा-तथा माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी नातवाचा पराभव केला होता. या वेळी काँग्रेसने शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे चिरंजीव अशोक पाटील-निलंगेकरांना संधी दिली नाही.

वरोरामध्ये नातलगात लढत

विदर्भातील वरोरा मतदारसंघात खासदार प्रतिभा धानोरकर यांचे नातलग आमने-सामने आले आहेत. खासदार धानोरकर यांनी ठिकाणी त्यांचे भाऊ प्रवीण काकडे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली आहे तर त्यांचे दीर अनिल धानोरकर हे वंचीत बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या दोन जवळच्या नातलगात होत असलेल्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Political leaders
Solapur Politics : ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का! उपनगराध्यक्षासह 15 नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com