Mumbai News : महायुतीमध्ये जागा वाटपाची धुसफूस आता समोर येऊ लागली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना राज्यात सर्वाधिक जागा लढवणार असल्याचे सांगून महायुतीचे टेन्शन वाढवले आहे.
शिवसेना राज्यात 120 जागा लढवणार असून, त्यातील 100 जागा जिंकण्याचे आमचं टार्गेट आहे, असे विधान करून महायुतीमध्ये टेन्शन, तर महाविकास आघाडीला आव्हान दिलं आहे.
महायुतीमधील जागा वाटपावर वरिष्ठ नेते काही बोलत नसताना, शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड यांनी मात्र शिवसेनाचा आकडा सांगून महायुतीत टेन्शन निर्माण करून दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेना 120 जागा लढणार असून, 100 जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे, असे आमदार गायकवाड यांनी सांगितलं.
आमदार गायकवाड यांनी 120 जागा सांगून, महायुतीत शिवसेनेचा जागा वाटपांबाबत काय भूमिका असेल, यावर आता चर्चा होऊ लागली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी 60 जागा राष्ट्रवादीच्या अगोदरच आहे, त्यात 20 ते 25 जागांची अधिक मागणी असेल, असे सांगितले आहे. म्हणजे, उर्वरीत जागा भाजप (BJP) आणि आणखी काही मित्र पक्षांना जातील, असा हिशोब निघतो. त्यामुळे महायुतीत जागा वाटपावरून राजकीय रणकंदन होणार असे दिसते.
आमदार संजय गायकवाड यांनी राज्यात शिवसेने 100 जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची विधानसभा निवडणुकीला समोरे जाण्याची जोरदार तयारी सुरू दिसते. अलीकडच्या कालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वाचे गुण उभारून येऊ लागले आहे. महायुतीत त्यांचाच चेहरा समोर येत आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा देखील त्यांच्यावर अधिक विश्वास आहे. यामुळे राज्यातील भाजप नेत्यांमध्ये त्यांच्याविषयी अस्वस्थता आहे.
सध्या महायुती टीम म्हणून काम करत आहे. जनतेचे काम आम्ही करतो. मुख्यमंत्री हा प्रमुख असतो. त्या दृष्टीने युतीच्या टीमचा कॅप्टन मीच आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या विधानावरून महायुतीत शिवसेनेचा जागा वाटपात दबदबा कायम राहील, असे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.