Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या शिवसेनेत? आदित्य ठाकरे 'डेंजर झोन'मध्ये…

Sunil Shinde Ekantha Shinde Uddhav Thackeray : सचिन अहिर यांच्यानंतर आता विधान परिषदेचा आणखी एक आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा आहे.

Roshan More

Shivsena Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार फुटल्यानंतर आता आमदार देखील शिंदेंच्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याची समोर येत आहे. मंगळवारी विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर हे ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज देखील दाखल केला आहे.

सचिन अहिर यांच्यानंतर विधान परिषदेतील ठाकरेंचा आमदार सुनील शिंदे हे देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त टिव्ही 9 मराठीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

सुनील शिंदे हे वरळी विधानसभेचे माजी आमदार आहेत. 2014 ला त्यांनी तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या सचिन अहिर यांचा पराभव केला होता. मात्र,2019 साठी त्यांनी हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी सोडला होता. त्यानंतर सुनील शिंदेंना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती.

सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सुनील शिंदे यांनी पक्षालाच घराचा आहेर देत सध्याच्या परिस्थितीचे आत्मचिंतन करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्यांनी सांगितले की, आपण जे बोललो ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी नाही, त्यांच्याबद्दल आपल्या मनात खूप आदर आहे. त्यांच्याबद्दल आपण वेडंवाकडं बोलणार नाही. पण इतर नेत्यांना आता कळायला हवं की कोणाला किती किंमत द्यायची.

...तर आदित्य ठाकरे डेंजर झोनमध्ये

सचिन अहिर यांच्यानंतर जर सुनील शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडली तर वरळी विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे वजन वाढेल. त्यामुळे तेथे विद्यमान आमदार असलेले आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मतदारसंघ पुन्हा लढताना तो तेवढा सोपा राहणार नाही. अहिर आणि शिंदेंच्या अनुभवामुळे येथे ठाकरेंसमोर आव्हान उभे राहू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT