Uttam Jankar Sarkarnama
महाराष्ट्र

Uttam Jankar : उत्तम जानकरांनी थोपटले दंड ; तब्बल 21 दिवसांचे नियोजन अन् मारकडवाडी ते मुंबई...

Uttam Jankar Markadwadi to Mumbai Rally : उत्तम जानकर म्हणाले, निवडणूक आयोगावर आमचा विश्वास राहिला नाही. आम्ही आता न्यायालयात जाणार आहोत. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यावर उत्तम जानकर हे ठाम आहेत.

Roshan More

Uttam Jankar : दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानावर प्रश्न चिन्हा उपस्थित केला. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी सर्व प्रथम बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत आमदराकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. मारकडवाडीत बॅलेट पेपरवर घेण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने तो प्रयत्न रोखला.

बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यावर उत्तम जानकर हे ठाम आहेत. त्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता आता जानकर हे थेट उच्च न्यायालयात जाणार आहेत. ते म्हणाले, निवडणूक आयोगावर आमचा विश्वास राहिला नाही. आम्ही आता न्यायालयात जाणार आहोत.

धानोर, मारकडवाडीसह माळशिरस तालुक्यामध्ये ईव्हीएम विरोधात आक्रोश आहे. तसा महाराष्ट्रात देखील असा आक्रोश आहे. हा आक्रोश मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर ऐकायला मिळेल. मारकडवाडी ते मुंबई अशी रॅली काढणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. तब्बल 21 दिवस प्रवास करत ही रॅली मुंबईत पोहोचणार असल्याचे जानकर म्हणाले.

राजीनामा देण्याची दाखवली तयारी

उत्तम जानकर हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. मात्र, निवडणुक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घेत असेल तर आपण राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्यास तयार असल्याचे ते म्हणाले होते. जानेवारी महिन्यात लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली होती.

अचानक मतदार कसे वाढले?

राहुल गांधी यांनी आज दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, पाच वर्षांत विधानसभा 2019 आणि लोकसभा 2024 निवडणुकीदरम्यान 32 लाख नवीन मतदार आले. लोकसभा निवडणुक ते महाराष्ट्र विधानसभा निवडणुक या पाच महिन्यांत 39 लाख नवे मतदार आले. हे नवे मतदार कोण आहेत, ते अचानक कसे वाढले, हा निवडणूक आयोगाला आमचा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही मतदार याद्यांची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT