Pankaja Munde : प्रश्नांवर प्रश्न, आरोपांवर आरोपांनंतर पंकजा मुंडेंचा संयम संपला; पत्रकारांना ताकीद देत ताड ताड निघून गेल्या

Pankaja Munde Beed Politics : बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यात आणि एसपींमध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली. पण काही क्षणांतच त्या मीडियावरच भडकल्याचं पाहायला मिळालं.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Beed News: महायुती सरकारमधील पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (ता.7) बीड पोलिस अधिक्षकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा, मुरुम वाहतूक यांवर चर्चा झाल्याचंही मुंडे यांनी सांगितले. पण याच शेवटी त्या मीडियावरच भडकल्या. पंकजा मुंडे (Pankaja Munde) सोडून मला इतर कुठलाही प्रश्न विचाराल तर बीड जिल्ह्याला आणखी खड्ड्यात घालाल अशी तंबीच पत्रकारांना देत त्या निघून गेल्या.

बीडमध्ये (Beed) पंकजा मुंडे यांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यात आणि एसपींमध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्या म्हणाल्या,बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा सुरू आहे.या प्रकरणी एसपींना कडक सूचना दिल्या आहेत. त्यांना नवनवीन कारवाईसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन कुठलाही दबाव न घेता या अवैध वाळू उपसावर कठोर कारवाई करण्यासंबंधीच्या सूचना दिल्याचंही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

तसेच अवैध वाळू उपसा थांबला पाहिजे.मोठमोठ डोंगर फोडून मुरुम उपसा सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचं, मतही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं. पण यानंतर मीडिया त्यांच्याशी आणखी प्रश्नोत्तरे करण्याच्या तयारीत असतानाच त्यांनी रौद्रावतार धारण करत पत्रकारांनाच तंबी दिली.

Pankaja Munde
Devendra Fadnavis On Mungantiwar : मंत्रिपदासाठी पत्ता कट झालेल्या सुधीरभाऊंबद्दल CM फडणवीसांनी 'असं' दाखवलं मोठं मन

पंकजा मुंडे म्हणाल्या,जर तुम्ही मला पंकजा मुंडे सोडून इतर कोणताही प्रश्न विचाराल तर बीड जिल्ह्याला आणखी खड्ड्यात घालाल असं संतप्त इशारा देत त्यांनी बीडमधील इतर राजकीय घडामोडींसह वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर अधिकचं भाष्य करणं टाळल्याचं दिसून आलं.त्यानंतर बीडच्या राजकारणात या प्रसंगाची चर्चा सुरू झाली होती.

एकीकडे संतोष देशमुख हत्येनंतरही बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढच होत असल्याचं दिसून येत आहे. केज तालुक्यात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या, व्हिडीओ का पाहतो असं म्हणून तरुणाला लाथाबुक्क्या,लोखंडी रॉडनं बेदम मारहाण करत गंभीर जखमी केलं होतं. त्यानंतर या आरोपींनी संतोष देशमुख हत्येप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचं स्टेटसही ठेवल्यानं कायदा आणि खाकीचा धाक उरला की नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.

Pankaja Munde
BJP Membership Meeting : भाजप सदस्य नोंदणीच्या बैठकीला आमदारांची दांडी, फडणवीसांचा संताप; बावनकुळे मोठी अ‍ॅक्शन घेणार?

त्याच धर्तीवर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी आता कठोर पावले उचलली आहेत. त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना अधीक्षक कार्यालयामध्ये बोलावून कॉवत यांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांना तंबीही दिली. दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांचं प्रमाण घटण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com