Eknath Shinde News : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक 27 मार्चला होणार आहे. महायुतीमध्ये या पाच जागांपैकी एक एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याा येत आहे. तर, तीन जागा भाजपला मिळणार आहेत. महायुतीकडे असलेला बहुमताचा आकडा पाहता ही निवड महायुती एकतर्फी जिंकेल. मात्र, महायुतीमध्येच विधान परिषदेची उमेदवारी मिळण्यासाठी चढाओढ आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अवघी एक जागा मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे हे उमेदवारी कोणाला देणाची याची जोरदार चर्चा आहेत. महिला नेत्यांची नावे त्यामध्ये आघाडीवर आहेत. मात्र, विधानसभेला तिकीट नाकारल्याने तत्कालीन पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे नाराज झाले होते.
वनगा हे घर सोडून निघून गेले होते. विधानसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आल्याने पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत. त्यांनी अन्नपाणी सोडलं आहे. त्यांचं काही बरंवाईट झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण, असा सवाल त्यांच्या पत्नीनं विचारला होता.
एकनाथ शिंदे यांनी तेव्हा वानगा कुटुंबीयांशी संवाद साधला होता. या संवादामध्ये त्यांनी श्रीनिवास वनगा यांना विधान परिषद देणार असल्याचा शब्द दिला होता. या विषयी वनगा यांच्या पत्नीनेच माहिती दिली होती. त्यानंतर श्रीनिवास वनगा हे पुन्हा घरी आले होते. त्यांनी आपला एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास असल्याचे देखील म्हटले होते. त्यामुळे शिंदे आत्ता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी श्रीनिवास वनगा यांना तिकीट देणार का? याची चर्चा पालघरमध्ये आहे.
सांगोला मतदारसंघातून पराभूत झालेले माजी आमदार शाहाजीबापू पाटील हे देखील विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी तशी जाहीर कबूल देखील दिली आहे. तसेच शिवसेनेमध्ये तीन माजी आमदारांनी नुकताच प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचा विचार तिकीटासाठी शिंदे करणार का? अशी देखील चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.