
Satara, 14 March : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधसानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव हा महाविकास आघाडीतील पक्षांसाठी मोठा धक्का होता. त्या धक्क्यातून हे पक्ष निकालानंतर काही दिवस सावरलेच नव्हते. मात्र काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातूनच ज्येष्ठ नेते शरद पवारांचे दोन शिलेदार बालेकिल्ल्याची डागडुजी करण्यासाठी कामाला लागले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) सोलापूर वगळता पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. दहापैकी सोलापूर जिल्ह्यात चार, पुणे आणि सांगलीत प्रत्येक एक जागा पक्षाची निवडून आलेली आहे. उर्वरीत कोल्हापूर आणि साताऱ्यात तर पवारांच्या राष्ट्रवादीला खातेही उघडता आलेली नाही, त्यामुळे पक्षाची बालेकिल्ल्यातच मोठी पीछेहाट झाली होती.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने नेत्यांवर विभागवार जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि शशिकांत शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते कामाला लागले आहेत.
बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राची डागडुजी सुरुवात या नेत्यांनी साताऱ्यातून केली आहे. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक रविवारी (ता. १६) सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी भवनात आयोजित केली आहे.
पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच आजी-माजी आमदार खासदार उपस्थित राहून या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचे तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष व सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष त्यांच्या सर्व कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.