EPFO update 2026 Sarkarnama
महाराष्ट्र

Ex MLA MP Pension: मनसेच्या माजी आमदाराचा मोदी सरकारवर नवा बॉम्ब; म्हणाले,'...म्हणून माझ्यासह सर्व माजी खासदार-आमदारांची पेन्शन बंद करा...'

Stop Pension For Ex MLAs MPs : राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी गुरुवारी(ता.16) रोखठोक भूमिका घेतली आहे. एकीकडे देशभरात आमदार-खासदारांची संख्या वाढण्याची चर्चा जोर धरू लागली असतानाच मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळासह सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News: दिल्लीत केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारनं महिला आरक्षण मतदारसंघांच्या फेररचनेशी जोडणाऱ्या नारीशक्ती वंदन घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्यासाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं आहे.या अधिवेशनात विधेयकावर सखोल चर्चा सुरू असून सत्ताधारी-विरोधकांमध्ये या विधेयकावरुन आरोप-प्रत्यारोपांचे जोरदार शा‍ब्दिक हल्ले चढवले जात आहे. याचदरम्यान,मनसेच्या माजी आमदारानं केंद्रातील मोदी सरकारवर मोठा बॉम्ब टाकला आहे.

राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी गुरुवारी(ता.16) रोखठोक भूमिका घेतली आहे. एकीकडे देशभरात आमदार-खासदारांची संख्या वाढण्याची चर्चा जोर धरू लागली असतानाच मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळासह सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

कल्याणचे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी माजी खासदार आणि आमदारांना मिळणारी पेन्शन आणि इतर सुविधा तातडीने बंद कराव्यात, अशी बेधडक मागणी केली आहे.ही मागणी करताना त्यांनी त्यांच्यासह माजी खासदार आणि आमदारांना दिल्या जात असलेल्या पेन्शनमधून प्रामाणिक करदात्यांच्या पैशांची नासाडी होत असल्याचा आरोप केला आहे.

राजू पाटील यांनी सोशल मीडियावरील x प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या अनुषंगाने वाढणारे लोकसभा व विधानसभा क्षेत्र यांची संख्या, म्हणजेच मोठ्या प्रमाणात खासदार व आमदारांची संख्या वाढणार असल्याचं म्हटलं आहे.

तसेच एकंदरीत आपल्या देशात माजी खासदार व माजी आमदार यांना दिल्या जाणाऱ्या पेन्शन व इतर सुविधांचा भार पण भविष्यात वाढतच जाणार आहे.खरंतर माजी खासदार व माजी आमदार ( यात मी पण आलो. ) यांना पेन्शन देण्याचे काहीच कारण नाही. प्रामाणिक करदात्या नागरिकांच्या पैशांची ही नासाडी थांबविण्यासाठी ही पेन्शन योजना कायमची बंद करायला हवी. संसदेच्या विशेष अधिवेशनात याविषयावर पण चर्चा व्हायला हवी,असंही पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

तसेच खासदार-आमदारांची संख्या वाढल्यानंतर पेन्शन आणि सुविधांचा आर्थिक भार सरकारी तिजोरीवर, म्हणजेच पर्यायाने जनतेवर वाढत जाणार असा दावाही माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक आणि करदात्यांच्या पैशाचा असा वापर होणं चुकीचं असून ही नासाडी आताच थांबवणं गरजेचं आहे," असं स्पष्ट मतही पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT