Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat News : 'पंचवीस वर्षात तुम्हाला इथे आत्मे दिसले नाहीत का'? इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाट यांना टोला!

Imtiaz Jaleel on Sanjay Shirsat statement : छत्रपती संभाजीनगर महापालिकेबाबत ‘आत्मे दिसतात’ या संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर इम्तियाज जलील यांचा जोरदार टोला. एआयएमआयएम आणि शिवसेनेत वाद तीव्र.
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on


Shivsena-Aimim News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ज्या जागेवर उभी आहे, तो भाग कब्रस्तानचा आहे. इथे मुडदे गाडले जायचे, त्यामुळे महापालिकेला ग्रहण लागले आहे. इथे आत्मे दिसतात, तुम्हाला बेचैन होते. यातून मुक्ती हवी असेल तर महापालिकेची इमारत चांगल्या जागेवर बांधा असे विधान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांना तुम्ही अनेक वर्ष या महापालिकेत नगरसेवक होतात, तुमचा पक्ष पंचवीस वर्षापासून याच जागेतून कारभार हाकत होता. तेव्हा तुम्हाला इथे आत्मे दिसले नाहीत का? असा टोला लगावला. तुमच्या मताशी मी सहमत आहे, एन-12 येथील ज्या जागेवर तुम्ही गुजरातच्या कंपनीला कचरा संकलनासाठी जागा देणार आहात, तिथे महापालिकेची भव्य नवी इमारत उभारा. माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, असे म्हणत सत्ताधाऱ्यांची गोची केली आहे.

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Nashik Corruption : नाशिकमध्ये लाचखोरीचा कहर ; २१० अधिकारी ACB च्या जाळ्यात, मुंबई-पुण्यालाही टाकलं मागे..

एन-12 भागातील महापालिकेच्या कचरा संकलन उपकेंद्राच्या विरोधात एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली होती. इम्तियाज जलील यांनी स्वत: याविरोधात आंदोलन केले होते. इम्तियाज जलील यांचे निवासस्थान या जागेच्या समोरच असल्यामुळे त्यांनी इथे कचरा संकलन उपकेंद्र नको आहे. त्यामुळेच ते याला विरोध करत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाने त्यांच्यावर केला होता. शिवाय इम्तियाज जलील हे ब्लॅकमेलिंग करतात, अशी टीकाही करण्यात आली होती.

अशातच शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काल महापालिकेतील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वादग्रस्त विधान केले. महापालिकेला ग्रहण लागले आहे, कारण इथे मुदडे गाडले गेलेले आहेत. ही जागा कब्रस्तानची असल्यामुळे इथले आत्मे बेचैन होऊन वर येतात आणि तुम्हालाही बेचैन होते. त्यांना आणि तुम्हालाही मुक्ती हवी असेल तर महापालिकेची जागा बदला. एखाद्या चांगल्या ठिकाणी भव्य इमारत उभी करा. त्यासाठी पाहिजे तितका निधी मी द्यायला तयार आहे, असे शिरसाट म्हणाले होते.

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
महिला आरक्षणासह खासदारांची संख्या 850 होणार; संसदेचे विशेष अधिवेशन नेमकं कशासाठी?

या विधानाची खिल्ली उडवतांना इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांना त्यांच्या नगरसेवक पदाच्या काळाची आठवण करून दिली. पंचवीस वर्षात तुम्हाला इथे आत्मे आहेत, याची जाणीव झाली नव्हती का? असे सुनावतानाच महापालिकेची नवी इमारत एन-12 येथील कचरा संकलन उपकेंद्राच्या जागेवर उभारण्याचा सल्ला दिला. तसेच यासाठी आपला पाठिंबाही असेल असे सांगत एका दगडात दोन पक्षी मारण्याची खेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com