Local Body Election 2025 Sarkarnama
महाराष्ट्र

Voter Facilities : मतदान केंद्रांत मोबाईल नेता येणार, आयोगाचे मतदारांसाठी रेड कार्पेट; 'या' असणार सुविधा!

Polling booth facilities for voters : राज्यात होणाऱ्या नगरपंचायत, नगपरिषदेची निवडणुकांसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना सोयीस्कर वातावरण मिळावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.

Rashmi Mane

राज्यात होणाऱ्या नगरपंचायत, नगपरिषदेची निवडणुकांसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना सोयीस्कर वातावरण मिळावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. विशेषत: दिव्यांग आणि जेष्ठ नागरिक मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रॅम्प आणि व्हिलचेअरची व्यवस्था सर्व मतदान केंद्रांवर केली जाणार आहे.

यावेळेस, मतदान केंद्रांच्या परिसरात मोबाईल नेण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास बंदी असेल. मतदान कक्षाबाहेर मोबाईल ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे, ज्याचे नियोजन संबंधित निवडणूक अधिकारी करतील.

प्रत्येक केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये, तसेच मतदारांना ओळीमध्ये थांबताना त्रास होऊ नये यासाठी सावलीची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याचे पॉईंट्स तयार करण्यात आले आहेत. तसेच यावेळी काही मतदान केंद्रांना विशेष “गुलाबी मतदान केंद्र” म्हणून घोषित करण्यात आले आहे. या गुलाबी केंद्रांवर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस महिला असतील.

निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी 288 निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत. तसेच 66,775 पोलिंग आणि काऊंटिंग स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी मतदान प्रक्रिया पारदर्शक योग्य पद्धतीने पार पडण्यात मदत करतील.

मतदानाचा दिवस हा लोकशाहीचा सण मानला जातो. त्यामुळे सर्व मतदारांनी निर्धास्तपणे मतदान केंद्रावर जाऊन आपले मताधिकार बजावावेत, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT