Local Body Election : मोठी बातमी : मुंबई हायकोर्टाने केला 'स्थानिक'च्या निवडणुकांचा मार्ग मोकळा, 4 याचिका फेटाळल्या...

Maharashtra local body elections High Court dismisses petitions : मुंबई हायकोर्टाने या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या 28 याचिकांपैकी चार महत्त्वाच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
Local Body Election bombay High Court
Local Body Election bombay High CourtSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सुरू असलेला गोंधळ अखेर संपला आहे. मुंबई हायकोर्टाने या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या 28 याचिकांपैकी चार महत्त्वाच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, मतदार याद्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार करण्यात आल्या असून त्या कायदेशीरदृष्ट्या योग्य आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा नाही, असे स्पष्ट करण्यात आले. आता या याचिकांवर पुढील सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे.

या याचिकांमध्ये प्रामुख्याने मतदार याद्यांतील त्रुटींवर आक्षेप घेण्यात आला होता. अनेक मतदारांची नावे दोन ठिकाणी असल्याचे, काहींची नावे वय 18 वर्षे पूर्ण होऊनही समाविष्ट नसल्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय, काही याचिकांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील पूरस्थितीचा दाखला देत निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, हायकोर्टाने पूरस्थिती ही निवडणुका थांबवण्याचे कारण ठरू शकत नाही, असे स्पष्ट करत हा मुद्दा फेटाळला आहेत.

Local Body Election bombay High Court
Political strategy BJP : महापालिका-झेडपी निवडणुका एकत्र न घेण्यामागे 'हा' आहे भाजपचा 'डाव'; बड्या नेत्यानं टाकला बॉम्ब

कोर्टाने सांगितले की, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत मतदार याद्या तयार केल्या आहेत. त्यामुळे त्या कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहेत आणि त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही.

Local Body Election bombay High Court
Kolhapur politics : महाडिकांच्या होमपीचवर सतेज पाटलांचा डोळा! शिरोली पुलाची रणसंग्राम पेटणार?

या निर्णयामुळे आता राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना हिरवा कंदील मिळाला आहे. निवडणूक आयोग ठरलेल्या वेळापत्रकानुसार पुढील प्रक्रिया सुरू करणार असून, येत्या काही दिवसांत औपचारिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com