

नागपूर : महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या पाच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. या निवडणुका एकत्र घेण्याची गरज आहे. मात्र भाजपला त्या स्वतंत्रपणे घ्यायच्या आहेत. त्यांना सर्व यंत्रणांचा दुरुपयोग करून घ्यायचा आहे. याकरिता सर्व स्थानिक निवडणुका वेगवेगळ्या आणि टप्प्याटप्याने घेण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
राज्यात स्थानिक निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. रोज सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करीत आहे. मतचोरीच्या आरोपांना जोर आला आहे. मतदार याद्यांमधील घोळाच्या विरोधक विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात आला. जो पर्यंत मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत निवडणुकाच पुढे ढकलण्याची मागणी करण्यात ठाकरे बंधु यांनी केली आहे.
या मोर्चात शरद पवार आणि काँग्रेसच्यावतीने विजय वेडट्टीवार, बाळासाहेब थोरातही सामील झाले होते. सर्वांनी ईव्हीएम आणि निवडणूक याद्यांमधील घोळाचा फायदा घेऊन भाजपने विधानसभेची निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे. दुबार मतदार हा सध्या कळीचा मुद्दा झाला आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांनी दुबार मतदार दिसल्यास त्यांना बडवून काढण्याचे आदेश सैनिकांना दिले आहे. या आरोपांना भाजपच्यावतीने आशिष शेलार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव यांना पप्पू ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवडणुकीवरून वातावरण तापले असताना निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद बोलावली आहे. कुठल्यातरी निवडणुकीची घोषणा आयोगामार्फत केली जाणार असल्याचा अंदाज वर्तविली जात आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी भाजपला महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र घ्यायच्या नसल्याचा आरोप केला.
स्थानिक निवडणुकीत भाजपला पराभवाची भीती वाटत आहे. त्यांनीच केलेले सर्वे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. एकत्र निवडणूक घेतल्यास महापालिका आणि जिल्हा परिषदा दोन्ही हातून जाऊ शकते याची चिंता त्यांना सतावत आहे. याशिवाय दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यास निवडणूक यंत्रणेचा दुरुपयोग करता येणार नाही. इकडची यंत्रणा तिकडे वापरता येणार नाही. हे बघता महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेगवेगळ्या घेण्याचा डाव भाजपचा आहे असा थेट आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.