Eknath Shinde’s campaign visit to Solapur triggers controversy over remarks on Pandit Deshmukh murder case. Sarkarnama
महाराष्ट्र

Pandit Deshmukh case : एकनाथ शिंदे लक्ष घालणार : 'पंडित देशमुखांच्या' हत्येची फाईल ओपन होणार? बाळराजे पाटलांसोबत होतं कनेक्शन

Pandit Deshmukh case : मोहोळ नगरपरिषद प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंडीत देशमुख खून प्रकरण निकाली काढण्याचा इशारा दिल्याने चर्चेला उधाण आले. या प्रकरणातील आरोपी बाळराजे पाटील यांना न्यायालयाने निर्दोष सोडले आहे.

सरकारनामा ब्युरो

Pandit Deshmukh case : शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंडीत देशमुख खून प्रकरणात जो कोणी आरोपी असेल त्याला सजा झालीच पाहिजे आणि चुकीला माफी नाही. कोर्टात तुम्हाला ॲड हरीश साळवे यांच्यासारखे निष्णात वकिलाची नेमणूक करण्यात येईल. येथील शिवसैनिक पंडीत देशमुख यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. परिणामाची पर्वा न करता मी खंबीरपणे पाठीशी उभा राहतो, असा सूचक इशारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशमुख यांच्या हत्येची फाईल पुन्हा ओपन करण्याबाबत सुतोवाच केलं आहे.

मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याआधी अनगर नगरपंचायत आणि नगराध्यक्षपद बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी या प्रकरणावर भाष्य केले होते. पाटील यांनी थेट माजी आमदार, भाजप नेते राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांना ‘सूत्रधार’ ठरवत गंभीर आरोप केले आहेत. अशात शिंदे यांनीही याविषयावर भाष्य केले आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे मोहोळ तालुका उपप्रमुख पंडित कमलाकर देशमुख (वय ४२, रा. देशमुख चाळ, मोहोळ) यांचा राजकीय वैमनस्यातून निर्घृण खून झाला होता. ही घटना ५ एप्रिल २००५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मोहोळ-नरखेड रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी तत्कालीन आमदार राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील, मोहोळचे तत्कालीन निरीक्षक अण्णासाहेब बंडगर यांच्यासह एकूण 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांच्या म्हणण्यांनुसार, पंडित देशमुख यांची हत्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच झाली होती. संतोष देशमुख हत्येपेक्षाही कितीतरी भयानक हत्या होती. पंडित देशमुख यांचे प्रथम अपहरण केले गेले. बाळराजे पाटील ज्या साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, त्या कारखान्यावर त्यांना नेले. तिथे प्रथम मारहाण झाली. नंतर दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्यांचे हात-पाय तोडले गेले. एकूण 57 वार केले गेले लोक सांगतात की, बाळराजे पाटील यांनी त्यांच्या तोंडात लघवीही केली, असा गंभीर आरोप उमेश पाटील यांनी केला.

राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे यांनी अजित पवारांना डिवचल्यानंतर उमेश पाटील आक्रमक झाले आहे. त्यांनी देशमुख यांच्या हत्येचा उल्लेख करत कशा पद्धतीनं तेव्हा राजन पाटील आर. आर. पाटलांच्या पाया पडले होते. याचा उल्लेख केला. तसेच या प्रकरणात 13 आरोपी होते. सत्र न्यायालयाने सर्वांना निर्दोष सोडले. मग पंडित देशमुख यांचा खून कुणी केला? असाही सवाल त्यांनी केला.

राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. मात्र गेल्या 20 वर्षांत हा खटलाच बोर्डावर येऊ दिलेला नाही. यामागे मोठ्या अधिकाऱ्यांचा हात आहे, असा आरोप उमेश पाटील यांचा आहे. आता एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाचा पुन्हा उल्लेख केला आहे. त्यांनी थेट फाईलच ओपन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीदरम्यान, आता हे प्रकरण पुन्हा तापणार हे निश्चित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT