Angar Election update : उज्ज्वला थिटेंचा मुलगाच होता सूचक, टॅक्टिक वापरून सही केली गायब; अजितदादांच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Ujjwala Thite controversy : उमेदवारी अर्ज बाद केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात दाद मागणार असल्याचे उज्ज्वला थिटे यांनी सांगितले.
Ujjwala Thite, Rajan Patil
Ujjwala Thite, Rajan PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra local elections : सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक संपूर्ण राज्यात गाजत आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कडेकोट बंदोबस्तात त्यांनी अर्ज भरला होता. पण छाननीमध्ये अर्ज बाद झाला आणि पुन्हा एकदा अनगरची निवडणूक प्रकाशझोतात आली आहे.

थिटेंच्या अर्जावर उमेदवाराची सही नसल्याने अर्ज बाद करण्यात आला आहे. मात्र, थिटेंसह राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी हा दावा फेटाळून लावत गंभीर आरोप केले आहेत. पाटील यांनी यामागे षडयंत्र असल्याचा दावा करताना म्हटले की, उज्जला थिटे यांच्या उमेदवारी अर्जासाठी त्यांचा मुलगाच सूचक आहे. त्याला विचारल्यानंतर त्याने सांगितले की, मी तीन ते चारवेळा आईची सही आहे की नाही ते पाहिले, माजी सही आहे की नाही ते पाहिले. असं असतानाही अर्ज बाद केला गेला.

आता सगळे म्हणत आहेत, तुम्हाला अर्ज दाखवतो. पण निश्चितपणे काहीतरी टॅक्टिक वापरून सूचकाची सही गायब करण्यात आली आहे. याची चौकशी व्हायला हवी. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हे षडयंत्र आहे. ते पळपुटे आहेत. आता पेनने लिहिलेले खोडरबरही मिळतात. ते ५० रुपयांत मिळतात. त्या रबराच्या सहाय्याने त्यांनी सही गायब केलेली असावी, असा संशय आहे. केवळ सहीच नाही, आणखी काही गोष्टी त्यांनी बदलल्या असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

Ujjwala Thite, Rajan Patil
Local Body Elections : सुप्रीम कोर्टातील आरक्षणावरील सुनावणीआधी वकिलांचं मोठं विधान; हजारो उमेदवारांचे भवितव्य धोक्यात...

थिटे म्हणाल्या, आपल्याविरोधात कुणी विरोधात उभे राहू नये म्हणून त्यांच्याकडून आधीच मतदारसंघातून नाव काढण्याचा प्रयत्न केला. मोठ्या गुन्ह्यातून माझा मुलगा सोडल्याचे ते सांगत होते. मग चार कागदं गायब करायला किती वेळ लागणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी मी सांगितले होते, भीतीमुळे आम्ही उद्या छाननीसाठी येऊ शकत नाही. आमचे वकीलही गेले नाहीत. त्याचाच फायदा त्यांनी घेतला. आम्ही सर्व कागदपत्रांची पुर्तता केली होती.

Ujjwala Thite, Rajan Patil
Angar NagarPanchayat : राजन पाटलांना भिडणाऱ्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद कसा झाला? वाचा 'Inside Story'

पाटील परिवाराविरोधात आधीपासूनच माझा लढा सुरू आहे. मुलाच्या दाखल्याची केस बाल हक्क आयोगात सुरू आहे. पोलिसांनी पुरावे मिटविले. पोलिसांविरोधातील केस मानवी हक्क आयोगात चालू आहे. आता माझा अर्ज बाद केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात जाणार असल्याचे थिटे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com