Senthil Balaji sarkarnama
महाराष्ट्र

Senthil Balaji : ईडीने अटक केलेले माजी मंत्री सेंथिल बालाजींना जामीन!

Senthil Balaji granted bail by Supreme Court : 14 जून 2023 मध्ये सेंथिल बालाजीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Roshan More

Senthil Balaji News: तामिळनाडूचे माजी मंत्री सेंथिल बालाजी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना आज (गुरुवारी) जामीन मंजूर केला.

14 जून 2023 मध्ये सेंथिल बालाजीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. खटल्याला विलंब होत असल्याने न्यायालयाने बालाजी यांचा जामीन मंजूर केला.

सेंथिल बालाजीला यांना गेल्यावर्षी 14 जून 2023 ला सरकारने अटक केली होती. 2014 मध्ये तमिळनाडूनच्या सरकारमध्ये परिवहन मंत्री असताना बालाजी यांच्यावर महानगर परिवहन महामंडळात लोकांना पैसे घेऊन नोकऱ्या दिल्याचा आरोप होता. बालाजीने मनी लाँड्रिंग केल्याचाही आरोप आहे.

बालाजीच्या अटकेवरून मोठा वाद झाला होता. बालाजी यांनाअटक झाल्यानंतर लगेचच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर 17 जुलै रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सेंथिल बालाजीची तामिळनाडूतील पुझल सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आणि तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

अटकेनंतर आठ महिन्याने राजीनामा

बालाजी हे अटकेत असताना देखील राजीनामा दिला नव्हता. त्यामुळ मुख्यमंत्री ए के स्टॅलिन यांच्यावर टीका होती. अटकेच्या आठ महिन्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. बालाजी यांनी अटकेनंतर राजीनामा दिला नव्हता त्यावेळी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी बालाजी यांच्यकाडील ऊर्जा, उत्पादन शुल्क ही खाती इतर मंत्र्यांना दिली होती. बालाजी हे तुरुंगात असताना मंत्री होते मात्र कोणत्याही खात्याचा पदभार त्यांच्याकडे नव्हता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT